विठ्ठलाची भक्ती असती तर मुख्यमंत्री नक्कीच पूजेला गेले असते – दिग्विजय सिंह

पुणे : राज्याच्या प्रमुखांनी विठ्ठलाची पूजा करण्याची परंपरा आहे. मुख्यमंत्र्यांनी स्वतः मराठा, धनगर समाजाला आरक्षण देतो असे सांगितले होते. त्यामुळे आज दोन्ही समाजांची नाराजी दिसून येत आहे. आजवर मुख्यमंत्री विठ्ठलाच्या पूजेला उपस्थित राहत होते. यंदा मात्र भाजपचा कोणीही मंत्री नव्हता, हे लोक एवढे का घाबरतात असा सवाल जेष्ठ काँग्रेस नेते दिग्विजय सिंग यांनी उपस्थित केला आहे.

तसेच विठ्ठलाची भक्ती असती तर मुख्यमंत्री नक्कीच पूजेला गेले असते, अशी टीकाही त्यांनी यावेळी केली. दिग्विजय सिंह गेल्या अनेक वर्षांपासून आषाढीला पंढरपूरला दर्शनासाठी जातात . यंदाही दर्शन घेऊन त्यांनी पुण्यात पत्रकारांशी संवाद साधला.

ते म्हणाले की, मुख्यमंत्र्यांना आज मराठा आणि धनगर समाजाच्या नाराजीचा सामना करावा लागत आहे, या गोष्टीला ते स्वतः जबाबदार आहेत. कारण त्यांनीच सत्तेत आल्यावर एका महिन्यात आरक्षण देण्याचा शब्द दिला होता.

‘भाजप लागलंय लुटायला पीएमपीएल काढलीय विकायला’

मराठ्यांच्या संयमाची परीक्षा घेवू नका… त्यांचा अंत बघू नका – धनंजय मुंडे