कुटुंब प्रमुखच खोटे बोलत असेल तर इतरांचे काय ? प्रकाश आंबेडकर

गडचिरोली : जीएसटीमुळे शासनाच्या तिजोरीत किती पैसा आला, याचे उत्तर मोदींकडे नाही. पंतप्रधान आपली शैक्षणिक कागदपत्रे दाखवायला तयार नाहीत. खोटे बोलण्याची प्रवृत्ती देशाच्या सर्वोच्चपदी बसलेल्या माणसात नसावी. देशाचा कुटुंब प्रमुखच खोटे बोलत असेल तर इतरांचे काय, अशा शब्दात भारिप बहुजन महासंघाचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांनी पंतप्रधानांना टोला लगावला.

कात्रटवार भवनात वंचित आघाडीच्या वतीने आयोजित संवाद यात्रेत मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी मंचावर उपराकार लक्ष्मण माने, माजी आमदार हरिदास भदे उपस्थित होते.

गणेशोत्सवाच्या मंडप उभारणीवरून राज ठाकरेंचा शिवसेनेवर निशाणा

You might also like
Comments
Loading...