Share

Skin Care Tips | चेहरा निस्तेज होत असेल, तर स्वयंपाक घरातील ‘या’ गोष्टी ठरतील उपयोगी

टीम महाराष्ट्र देशा: हिवाळा (Winter) सुरू होताच त्वचा (Skin) च्या समस्या देखील सुरू व्हायला लागतात. त्याचबरोबर हिवाळ्यामध्ये त्वचा कोरडी पडायला लागते. त्यामुळे चेहऱ्यावरची चमक कमी व्हायला लागते. अशा परिस्थितीत आपण बाजारात उपलब्ध असलेले सौंदर्य उत्पादनांचा वापर करतो. पण अनेकदा ते उत्पादन आपल्या त्वचेला मानवत नाही. म्हणूनच आज या बातमीच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला काही घरगुती उपायांबद्दल सांगणार आहोत. ज्याच्या उपयोगाने तुम्ही हिवाळ्यामध्ये कोरड्या त्वचेची समस्या मिटवू शकता.

हिवाळ्यामध्ये त्वचा (Skin) निरोगी ठेवण्यासाठी पुढील टिप्स फॉलो करा

बदाम तेल

हिवळ्यामध्ये त्वचेवरील कोरडेपणाची समस्या मिटवण्यासाठी बदाम तेल एक रामबाण उपाय ठरू शकतो. यासाठी तुम्हाला बदाम तेलामध्ये थोडे मध मिसळून त्वचेवर लावून दहा मिनिटे मालिश करावी लागेल. बदाम तेलाच्या वापराने काही दिवसातच तुम्हाला तुमच्या त्वचेमध्ये फरक जाणवेल.

दुधाची साय

दूध जसे आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर असते. त्याचप्रमाणे दुधावर येणारी साय देखील आपल्या त्वचेसाठी खूप फायदेशीर असते. हिवाळ्यामध्ये दुधाची साय नियमित आपल्या त्वचेवर लावल्यास त्वचेवरील कोरडेपणाची समस्या नाहीशी होते. आणि त्वचा चमकदार बनते.

खोबरेल तेल

खोबरेल तेलामध्ये आढळणारे गुणधर्म आपली त्वचा हायड्रेट करते. खोबरेल तेलामध्ये असलेले सॅच्युरेटेड फँटि ॲसिड त्वचेवरील कोरडेपणा दूर करतो. त्यामुळे हिवाळ्यामध्ये नियमितपणे खोबरेल तेलाचा त्वचेवर उपयोग केल्यास त्वचा मऊ होऊ शकते.

कोरफड

आजकाल बाजारामध्ये कोरफडीचे जेल सहजपणे उपलब्ध असते. त्याचबरोबर जवळपास प्रत्येक घरामध्ये कोरफड आढळते. हिवाळ्यामध्ये कोरफड कापून त्वचेवर नियमित लावल्यास त्वचेवरील कोरडेपणाची समस्या नाहीशी होऊ शकते. त्याचबरोबर कोरफडीच्या नियमित वापराने तुमची त्वचा चमकदार बनू शकते.

सूर्यफूल तेल

हिवाळ्यामध्ये रात्री झोपण्यापूर्वी सूर्यफुलाचे तेल लावणे त्वचेसाठी खूप फायदेशीर ठरू शकते. झोपण्यापूर्वी सूर्यफुलाचे तेल लावल्याने तुम्हाला सकाळी तुमच्या त्वचेमध्ये फरक जाणवेल. हे तेल आपल्या त्वचेसाठी मॉइश्चरायझर म्हणून काम करते.

टीप : वरील माहिती लागू करण्यापूर्वी संबंधित तज्ञाचा सल्ला घ्यावा.

महत्वाच्या बातम्या 

टीम महाराष्ट्र देशा: हिवाळा (Winter) सुरू होताच त्वचा (Skin) च्या समस्या देखील सुरू व्हायला लागतात. त्याचबरोबर हिवाळ्यामध्ये त्वचा कोरडी पडायला …

पुढे वाचा

Health

Join WhatsApp

Join Now