पुणे : केंद्र सरकारने कांद्यावर निर्यातबंदी घातल्यावर बळीराजा शेतकरी संघटनेच्या वतीने पुणे जिल्हाअधिकारी कार्यालयावर आंदोलन करण्यात आले. पुण्यात जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर कार्यकर्त्यांनी एकत्र येत घोषणाबाजी करत केंद्र सरकाराचा निषेध केला. केंद्रानं निर्यातबंदी उठवावी अशी मागणी या वेळी करण्यात आली. यावेळी बळीराजाच्या कार्यकर्त्यांनी गळ्यात कांद्याच्या माळा घातल्या होत्या. पोस्टरबाजी करत निर्यात बंदी हटवा अश्या घोषणाबाजी केल्या गेल्या ,जर निर्यात बंदी हटवली नाही तर याचे पडसाद त्रिवार होतील असा इशारा बळीराजा शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रमेश गणगे यांनी दिला.
पहा व्हिडिओ :
महत्वाच्या बातम्या :
- लंम्पी आजाराबाबत जनावरांचे मोफत लसीकरण करा- युक्रांद
- निलेश लंके यांच्या प्रयत्नांना यश; के.के.रेंजसाठी भूसंपादन होणार नाही- राजनाथ सिंह
- कांदा निर्यात बंदीचा निर्णय मागे घ्या, अन्यथा रस्त्यावर उतरू; राहुल जगताप आक्रमक
- राज्य शासनाचा गोंधळात गोंधळ; नियोजन नसल्याने इंदूमिल येथील पायाभरणीचा कार्यक्रम रद्द
- जायकवाडी धरणाचे 27 दरवाजे उघडले, काढच्या गावांना सतर्कतेचा इशारा