fbpx

मंत्र्यांच्या भ्रष्टाचारचे दिलेले पुरावे खोटे असतील तर आम्हाला कोणत्याही चौकात फाशी द्या!

धनंजय मुंडे

कोल्हापूर: राष्ट्रवादी कॉंग्रेसचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्र्यांवर जोरदार हल्लाबोल चढवला. मुख्यमंत्र्यांनी भ्रष्टाचारमुक्त महाराष्ट्राची घोषणा केली. यांच्याच १६ मंत्र्यांनी भ्रष्टाचारात महाराष्ट्र लुटला. असे धनंजय मुंडे यांनी स्पष्ट केले. राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या हल्लाबोल आंदोलनाच्या चौथ्या टप्प्यात धनंजय मुंडे कोल्हापूर येथे बोलत होते.

धनंजय मुंडे म्हणाले, माझं मुख्यमंत्र्यांना आव्हान आहे जर आम्ही मंत्र्यांच्या भ्रष्टाचारचे दिलेले पुरावे खोटे असतील तर आम्हाला कोणत्याही चौकात फाशी द्या! पण जर खरे असतील तर या मंत्र्यांना घरी पाठवा. असे आव्हान मुंडेनी केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करतांना धनंजय मुंडे म्हणाले, पंतप्रधान मोदी यांनी प्रत्येकाच्या खात्यात १५ लाख रुपये टाकण्याचे आश्वासन दिले होते मात्र अजून १५ पैसेही लोकांना मिळालेले नाही. आज निरव मोदीसारखे लोकं बँकांचे पैसे पळवत आहेत.

1 Comment

Click here to post a comment