fbpx

निवडणूक निकालात फेरफार झाल्यास हत्यार उचलू – कुशवाह

टीम महाराष्ट्र देशा : ईव्हीएम संदर्भात तक्रार करण्यासाठी आज २२ प्रमुख विरोधी पक्षांची बैठक दिल्लीत पार पडली आहे, आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक घेण्यात आली. बैठकीनंतर सर्व नेते निवडणूक आयोगाला भेटून तक्रार देणार आहेत.

दरम्यान, बैठकीला उपस्थित असणारे आरएलएसपी पक्षाचे नेते उपेंद्र कुशवाह यांनी हिंसेची भाषा केली आहे. कुशवाह यांनी इशारा देत ईव्हीएमच्या गडबडीमुळे निकालांत फेरफार झाल्यास हत्यार उचलण्याचा इशारा दिला आहे. २०१४ मध्ये भाजपसोबत लढलेले कुशवाह यंदा महागठबंधनसोबत लढत आहेत.

उपेंद्र कुशवाह प्रधानमंत्री आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांना इशारा देत म्हणाले, ईव्हीएममध्ये गडबड करण्याचे काम तुम्ही करत असाल तर थांबवा, असं काही झाल्यास महागठबंधनचे लोक हत्यार उचलतील. प्रशासनाने देखील सर्व सुरळीत होण्याची काळजी घ्यावी, अन्यथा लोकांमध्ये असणारा संताप बाहेर येईल.