ज्येष्ठांनी सांगितल्यास विधानसभा लढवणार, रोहित पवारांचे सूचक विधान

सोलापूर : बारामती मतदारसंघातून अजितदादा हेच निवडणूक लढवणार हे अंतिम आहे. मात्र याबाबत चर्चा का होते हे कळत नाही. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कार्यकर्ता म्हणून काम करत असून पक्षाने दिलेल्या जबाबदारीनुसार आमदार निवडून आणायचे आहेत. तसेच वरिष्ठांनी आदेश दिल्यास निवडणूक देखील लढवण्यास तयार असल्याचे, सूचक विधान पुणे जिल्हा परिषद सदस्य रोहित पवार यांनी केले. सोलापूर पत्रकारसंघात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

पुढे बोलताना ते म्हणाले, पक्ष 15 वर्षे सत्तेत राहिल्याने पक्षांतर्गत गटबाजी वाढली आहे. भविष्याच्या दृष्टीने विचार करून संघटना स्ट्रॉंग व्हायला हवी अशी भूमिका त्यांनी मांडली. केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी अजित पवार मुख्यमंत्री होणार नाहीत या व्यक्तव्याला किंमत नसल्याचंही ते यावेळी म्हणाले

राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांचे नातू असणारे रोहित पवार हे सध्या पक्ष संघटनेत चांगलेच सक्रिय झाल्याचे दिसत आहे. पुणे तसेच इतर जिल्ह्यामध्ये देखील ते पक्षाच्या कार्यक्रमांना आवर्जून हजेरी लावतात. त्यामुळे आगामी काळात रोहित हे बारामतीमधून विधानसभा निवडणुक लढवणार असल्याची चर्चा होत राहते. परंतु बारामतीमध्ये अजित दादाच निवडणूक लढवणार असल्याचे त्यांनी अनेकदा सांगितले आहे.

You might also like
Comments
Loading...