मुंबई – भारतीय जनता पक्षाने राज्यातील विरोधी पक्ष संपवून सत्ता मिळवण्याच्या हव्यासापोटी लोकशाहीचे धिंडवडे काढले आहेत. सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीने अनेक प्रश्न उपस्थित झाले असून कोर्टाच्या ‘जैसे थे’ परिस्थिती ठेवण्यामुळे सध्यातरी शिंदे–फडणवीसांचे असंवैधानिक सरकार दोघांचेच राहिल व मंत्रिमंडळ विस्तारही करता येणार नाही तसेच महत्त्वाचे निर्णयही घेता येणार नाहीत, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी म्हटले आहे.
सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीनंतर बोलताना अतुल लोंढे म्हणाले की, जेष्ठ वकील कपील सिब्बल यांनी कोर्टात जैसे थे चा मुद्दा उपस्थित केला असता वकील अभिषेक मनु सिंघवी यांनी कोर्टाने आधीच जैसे थे परिस्थिती ठेवण्याचे सांगितले आहे असे म्हटले.
महत्वाच्या बातम्या :
- Devendra Fadanvis on OBC Reservation | दिलेला शब्द पाळला! OBC आरक्षणावर देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया
- Kishori Pednekar : “संजय राऊत आणि अनिल परब शिवसेनेचे वाघ आहेत, ते या सगळ्याला… “; किशोरी पेडणेकरांच राणांना प्रत्युत्तर
- Balasaheb Thorat : मीच ‘मुख्यमंत्री’ आहे, हे एकनाथ शिंदेना सिद्ध कराव लागेल – बाळसाहेब थोरात
- Rohit Pawar on OBC Reservation | हा तत्कालीन महाविकास आघाडी सरकारचा विजय – रोहित पवार
- Obc Reservation : OBC आरक्षणावर सर्वोच्च न्यायालयाच्या निकालावर धनंजय मुंडेंची प्रतिक्रिया
>>> आमच्या सोशल मीडिया फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील व्हा! फेसबुक & टेलिग्राम ग्रुप <<<
>>> आपल्या परिसरातील महत्त्वाच्या समस्यांना वाचा फोडून, तुमच्या बातमीने बदल घडवा. { बातमी पाठवा SUBMIT NEWS } <<<