fbpx

गो-तस्कर सापडला तर त्याला थोडेफार कानाखाली वाजवा आणि झाडाला बांधा, भाजप नेत्याची मुक्ताफळे

टीम महाराष्ट्र देशा : एखादा गो-तस्कर हाती सापडला तर त्याला थोडेफार कानाखाली वाजवा आणि झाडाला बांधा. त्यानंतर पोलिसांना बोलवा’, असं वादग्रस्त विधान भाजपचे आमदार ज्ञानदेव अहुजा यांनी राजस्थानच्या अलवर भागात पत्रकारांशी बोलताना त्यांनी हे वक्तव्य केलं. त्यांच्या या विधानामुळे भाजप पुन्हा अडचणीत सापडलं आहे.

राजस्थानच्या अलवर भागात जमावाने रकबर खान उर्फ अकबर खान याला प्रचंड मारझोड करत त्याची हत्या केली होती. त्यानंतर २० जुलै रोजी या मतदार संघाचे आमदार म्हणून ज्ञानदेव अहुजा यांनी पत्रकार परिषद बोलवली. यावेळी आपली भूमिका मांडतांना त्यांनी हे वादग्रस्त वक्तव्य केलं. मात्र त्यानंतर इंग्रजी वृत्तपत्राकडे त्यांनी स्पष्टीकरण देताना माझ्या विधानाचा अर्थ चुकीचा घेतला जात असल्याचं म्हटलं. ‘माझ्या बोलण्याचा अर्थ इतकाच होता की, गो-तस्करांना इतकी मारहाण करू नये. जमावाने त्यांच्यावर हल्ला करू नये. त्यापेक्षा दोन-चार कानखाली माराव्या आणि झाडाला बांधून ठेवावं म्हणजे तो पळून जाणार नाही. कायदा हातात न घेता त्याला पोलिसांच्या ताब्यात द्यावं’. दरम्यान आहुजा यांनी वादग्रस्त विधान करण्याची ही पहिली वेळ नाही. या आधी देखील त्यांनी गो-हत्या हा दहशतवादापेक्षा मोठा गुन्हा असून दहशतवादी २-५ लोकांना मारतात पण गो-तस्कर हे लाखों लोकांच्या भावना दुखावतात, असं म्हटलं होतं.

रकबर यांच्या हत्येसंदर्भात बोलताना ते म्हणाले की, याप्रकरणी ज्या तीन जणांना अटक करण्यात आली आहे ते निर्दोष आहेत. पोलीस त्यांना अडकवू पाहात असल्याचा आरोप देखील त्यांनी यावेळी केला.

धर्माच्या आधारे देशाचे विभाजन करण्यासाठी सावरकरच जबाबदार – अय्यर