मुंबई : शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी काल (२९ जून) फेसबुक लाईव्ह येत मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला. ठाकरे सरकार कोसळल्यानंतर अनेक क्षेत्रातून या संदर्भात प्रतिक्रिया उमटत आहेत. राजकारणात झालेल्या या ऐतिहासिक घटनेमुळे आता नवीन मुख्यमंत्री भाजपचा होणार या चर्चांना उधाण आलं आहे. भाजप सोबत किती आणि कोणती मंत्रिपदे जाणार याबाबत वावड्या उठायला लागल्या आहेत. मंत्रिपदाच्या याद्या अनेक ठिकाणी व्हायरल होत आहेत.
एकनाथ शिंदे यांनी याबाबत ट्विट करत माहिती दिली आहे होती. भाजप सोबत कोणती आणि किती मंत्री पदे असणार याबाबत कोणतीही चर्चा झालेली नसल्याचे एकनाथ शिंदे यांनी सांगितले होते. अशातच आता एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्या राजीनाम्याबाबत भाष्य केले आहे.
उद्धव ठाकरेंच्या राजीनाम्यावर एकनाथ शिंदे म्हणाले, “आम्हाला आनंद नाही. सर्व ५० आमदारांची एकच मागणी होती. आमदारांना मतदारसंघात अडचणी होत्या. तेव्हा आपण बाळासाहेबांच्या हिंदुत्वाचा विचार पुढे घेऊन जाऊयात अशी सर्व ५० आमदारांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी होती. वेळीच निर्णय घेतला असता तर ही वेळ आली नसती. आम्हाला कोणालाही आनंद नाही. उद्धव ठाकरेंबद्दल आमच्या मनात कालही आदर होता आणि आजही आहे”.
आज गोव्यामध्ये एकनाथ शिंदे आणि इतर आमदारांची बैठक पार पडली. यानंतर एकनाथ शिंदे राज्यपालांना भेटायला जात असल्याचे त्यांनी माध्यमांना सांगितले. उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर आता चित्र स्पष्ट झाले आहे. एकनाथ शिंदे मुंबईत येऊन सर्वप्रथम राज्यपालांना भेटणार आहेत अशी माहिती समोर येत आहे. या पार्श्वभूमीवर भाजपाचे देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यामध्ये बैठक होणार असल्याच समजतंय.
या बैठकीमध्ये मंत्रिमंडळाबाबत आणि पदांबाबत चर्चा होणार का याकडे सगळ्यांच लक्ष लागलेलं आहे. दहा दिवसांपूर्वी सुरतला गेलेले एकनाथ शिंदे मुंबईला परत येणार आहेत. त्यामुळे मुंबईमध्ये कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. उद्धव ठाकरे यांच्या मुख्यमंत्री पदाच्या राजीनाम्या नंतर भाजपच्या देखील हालचालींना वेग आला होता. अशातच आता शिंदे गटाकडून देखील त्या अनुषंगाने हालचाली होताना दिसत आहेत. शिंदे यांची राज्यपाल आणि देवेंद्र फडणवीस यांच्याशी होणारी भेट अजून कोणता राजकीय भूकंप आणणार का हे पाहावे लागणार आहे.
महत्वाच्या बातम्या :
- Urmila Matondkar : “तुमच्या नेतृत्वामुळे…”, उद्धव ठाकरेंच्या राजीनाम्यानंतर उर्मिला मातोंडकरांची प्रतिक्रिया
- Imtiaz Jalil : औरंगाबादचं नाव बदलून मुख्यमंत्र्यांनी घाणेरडे राजकारण केलयं; इम्तियाज जलील यांनी फटकारलं
- Political Crisis : “प्रत्येक लाडूंची किंमत ५० ते १०० कोटी”, कॉंग्रेसचा भाजपवर निशाणा
- Bacchu Kadu : लॉजिक की मॅजिक? ठाकरे सरकार कोसळताच ‘त्या’ प्रकरणी बच्चू कडूंना ‘क्लीन चिट’
- Sanjay Raut : नेमकं हेच घडलं! “आपल्याच माणसांनी दिलेले पाठीवरचे घाव…”, संजय राऊतांचे ट्वीट चर्चेत
>>> TOP CATEGORIES - राजकारण । क्रीडा बातम्या । कृषी बातम्या । आरोग्य बातम्या | मनोरंजन बातम्या । नोकरी बातम्या । मुंबई बातम्या । पुणे बातम्या । औरंगाबाद बातम्या । नाशिक बातम्या। नागपूर बातम्या । व्हिडीओ बातम्या । Trending News <<<
>>> आमच्या सोशल मीडिया फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील व्हा! फेसबुक & टेलिग्राम ग्रुप <<<
>>> आपल्या परिसरातील महत्त्वाच्या समस्यांना वाचा फोडून, तुमच्या बातमीने बदल घडवा. { बातमी पाठवा SUBMIT NEWS } <<<