… तर शिवसेना राष्ट्रवादीसोबत – जयंत पाटील

jayant patil

मुंबई : सत्ता येत जात असते त्याचे दु:ख वाटून घ्यायचे नसते. मात्र आत्ता ज्यांच्या हाती सत्ता आहे, त्यांच्यामुळे चिंता करण्याची गरज आहे. प्रसारमाध्यम, न्यायव्यवस्था, निवडणूक घेण्याची व्यवस्था यांवर गेल्या चार वर्षांत सरकारने प्रभाव तयार केला असून, या विरोधात सर्व विरोधी पक्षांनी एकत्र येण्याची गरज आहे. आणखी काही काळ गेला तर शिवसेनाही आपल्यासोबत असेल, असं प्रतिपादन राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केलं आहे.

राज्यातील धर्मनिरपेक्ष राजकीय पक्षांसह संस्था व संघटनांच्या प्रतिनिधींनी एकजूट करत ‘मित्र लोकशाहीचे’ हा फोरम स्थापित केला आहे. या फोरमने मुंबई मराठी पत्रकार संघात बुधवारी आयोजित केलेल्या ‘संवादातून सहमतीकडे २०१९’ या परिसंवादात पाटील बोलत होते.

2 Comments

Click here to post a comment