मुलाचे नाव ‘शिवाजी’ ठेवले तर एनओसी साताऱ्यातून मागवायची का?उदयनराजेंना आव्हाडांचा सवाल

blank

टीम महाराष्ट्र देशा:उदयनराजे यांच्यावर बाबासाहेब पुरंदरेंचे संस्कार आहेत. आपण एखाद्याला लोकनायक म्हणतो, लोकनेते म्हणतो. तसं शरद पवार यांना जाणते राजे म्हणतो. छत्रपती शिवाजी महाराज आपण कुणाला म्हणत नाही. कुणाच्या घरात मुलाचं नाव ‘शिवाजी’ ठेवलं तर काय एनओसी साताऱ्यातून मागवायची का? असा प्रश्न जितेंद्र आव्हाडांनी उदयन राजेंना विचारला आहे.

साताऱ्याचे माजी खासदार उदयनराजे भोसले यांनी वादग्रस्त पुस्तकावरुन सकाळी पत्रकार परिषद घेऊन शिवसेनेवर तसेच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांवर हल्ला चढवला. जाणते राजे फक्त शिवाजी महाराजच आहेत, अन्य कोणी नाही, असं म्हणत उदयनराजेंनी शरद पवारांवर निशाणा साधला. या टीकेनंतर राष्ट्रवादीचे नेते आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी उदयनराजेंवर पलटवार केला.

जगभरात जाणते राजे हे फक्त शिवाजी महाराजच आहेत, अन्य कोणी नाही,जाणता राजा उपमा देताना शिवाजी महाराजांनी त्या काळात काय केलं ते पाहावं, महाराजांनी कार्यपद्धतीने जगाला आपलं कर्तृत्व दाखवून दिलं. स्वतःला जाणता राजा म्हणून घेण्याचा दुसरा कोणाचा अधिकार नाही. सो कॉल्ड जाणते राजे कोणी त्यांना उपमा दिली माहिती नाही. कोणताही पक्ष असला तरी सोयीप्रमाणे सर्वजण छत्रपती शिवरायांचं नाव का घेता. त्यांचं आचरण केलं असतं तर ही परिस्थिती आली नसती. हे तुम्ही लोकांनी निवडून दिलेले लोकशाहीतले जाणते राजे म्हणे. राज्याच्या खेळळांडो केलाय, किळस वाटते. असं म्हणत उदयनराजेंनी शरद पवारांवर सकाळी निशाणा साधला होता.

त्यावर आव्हाडांचे उत्तर आले आहे.जय भगवान गोयल यांच्या पुस्तकावरून महाराष्ट्रात राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.