मुख्यमंत्र्यांनी अजित पवारांकडे ट्युशन लावली तर इरिगेशनचा विषय येईल… -रामदास आठवले

सुप्रिया सुळे यांच्या टिप्पणीवर आटवले यांची फिरकी

पुणे: राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्र्यांनी अजित पवार यांचाकडे ट्युशन लावावी असे म्हटले होते. त्यानंतर अनेक राजकीय प्रतिक्रिया उमटू लागल्या तसेच या वक्तव्याची सोशल मिडीयावर देखील खिल्ली उडवण्यात आली. दरम्यान, केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी मुख्यमंत्र्यांनी पवारांकडे ट्युशन लावली तर इरिगेशनचा विषय येईल. अशी फिरकी घेतली.

रामदास आठवले पुढे म्हणाले, पक्षाचा विस्तार करण्यासाठी केवळ दलित वाड्यात शाखा काढून भागणार नाही, तर प्रत्येक गावात शाखा झाली पाहिजे. कार्यकर्त्यांनी फक्त शायनिंग करून पक्ष वाढणार नाही. अपक्ष निवडून येतात पण एकही आमदार निवडून आणता येत नाही, यासाठी आत्मपरीक्षण करणार असल्याचे आठवले म्हणाले. तसेच पक्षातील ५० टक्के पदे दलितेतर समाजाला देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे ते म्हणाले.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आगामी निवडणुका स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला. त्यावर बोलतांना आठवले म्हणाले, उद्धव ठाकरे आणि नरेंद्र मोदींची भेट व्हावी यासाठी मी प्रयत्नशील आहे. भाजप-शिवसेना एकत्र राहणं फायद्याचं,गरजेचं असल्याचे काल गोंदिया भंडारा सभेवेळी मुख्यमंत्र्यांच्या कानावर घातले.

हमारी नियत साफ २०१९ को काँग्रेस साफ…

मुख्यमंत्र्यांच्या ऑडीओ क्लिप संदर्भात आटवले यांनी मुख्यमंत्र्यांची पाठराखण केली. ‘मुख्यमंत्री साम ,दंड ,भेद असं म्हणाले असतील …दाम म्हटले नसतील, आम्हाला निवडणुका जिंकण्यासाठी पैसे वाटण्याची आवश्यकता नाही, “साफ नियत, सही विकास” या घोषणेवर हमारी नियत साफ २०१९ को काँग्रेस साफ… अशा आपल्या खास शैलीत त्यांनी कॉंग्रेसचा देखील समाचार घेतला.

You might also like
Comments
Loading...