मुंबई : राज्यातील राजकारणात सध्या शिवसेनेच्या स्थितीवर मनसे कडून जोरदार टीका केली जात आहे. राज्यात एकनाथ शिंदे यांनी भाजपशी हात मिळवून सत्ता स्थापन केली. एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री तर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. यानंतरच्या काळात लवकरच मंत्रिमंडळाचा ही विस्तार केला जाईल असे सांगितले गेले होते. मात्र अजूनही राज्यात मंत्रिमंडळ विस्तार झालेला नाही.
दरम्यान, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांना एकनाथ शिंदे सरकार मध्ये मंत्रीपद मिळणार अशी चर्चा सुरू झाली होती. मात्र राज ठाकरेंनी बोलताना या चर्चेला पूर्णविराम दिला आहे. शिवसेनेच्या नेत्या मनीषा कायंदे यांनी सडेतोड उत्तर दिलं आहे. त्या माध्यमांशी बोलताना म्हणाल्या की, “राज ठाकरे यांनी स्वतःच्या मुलालाच का राजकारणात पुढे आणले, संदीप देशपांडे यांना का पुढे आणले नाही.” असा सवाल मनीषा कायंदे यांनी उपस्थित केला आहे.”शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे विचार पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हेच पुढे नेत आहेत.” असेही मनीषा कायंदे यांनी म्हटले आहे.
महत्वाच्या बातम्या :
- Ajit Pawar | राज्यात ओला दुष्काळ जाहीर करावा; अजित पवार यांची मागणी
- Pankaja Munde | पंकजा मुंडे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देणाऱ्या बॅनर्स वरून भाजपचे नेते गायब
- Manisha Kayande : राज ठाकरेंनी स्वतःच्या मुलालाच राजकारणात पुढे आणलं, देशपांडेंना का नाही? – मनीषा कायंदे
- Uddhav Thackeray : राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या जंजिरमध्ये अडकलेल्यांनी खंजीरची भाषा करु नये; शिंदेंचा ठाकरेंना टोला
- Arjun Khotkar | मराठवाड्यातील शिवसेना खिळखिळी; अर्जुन खोतकर शिंदे गटात सामील
>>> आमच्या सोशल मीडिया फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील व्हा! फेसबुक & टेलिग्राम ग्रुप <<<
>>> आपल्या परिसरातील महत्त्वाच्या समस्यांना वाचा फोडून, तुमच्या बातमीने बदल घडवा. { बातमी पाठवा SUBMIT NEWS } <<<