मुंबई : उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या बंगल्याजवळ जिलेटीन स्फोटकांनी भरलेली स्कॉर्पिओ गाडी आढळली होती. शुक्रवारी या गाडीचे मालक मनसुख हिरेन यांचा मृतदेह मुंब्रा येथील रेती बंदराजवळ सापडला आणि या प्रकरणाला गंभीर वळण लागले. मनसुख हिरेन बेपत्ता असल्याची तक्रारही दाखल करण्यात आली होती.
दरम्यान, महत्त्वाचं म्हणजे हिरेन यांच्या मृत्यूनंतर पोलीस अधिकारी सचिन वाझे यांचं नाव घेतलं जात असून या प्रकरणाचा तपास राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे देण्यात यावा, अशी मागणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. आता, या प्रकरणाचा तपास एनआयए करणार आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाने हा तपास एनआयएकडे सोपवला आहे.
याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी भाष्य केलं आहे. ‘यापूर्वीच हा तपास गृहमंत्र्यांनी एटीएसकडे दिला आहे. आमचा आमच्या यंत्रणांवर विश्वास आहे. या व्यतिरिक्त हा या प्रकरणाचा तपास एनआयएकडे देण्याचा केंद्राचा विचार असेल तर नक्कीच यात काही काळंबेरं आहे. आम्ही सुद्धा तपासातून ते उघड करणार आहोत.’ अशी शंका उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केली असून भाजप महाराष्ट्राला बदनाम करण्याचं काम करत असल्याची टीका देखील त्यांनी केली आहे.
महत्त्वाच्या बातम्या :
- शेतकरी आणि ग्रामीण महाराष्ट्रासाठी निराशाजनक अर्थसंकल्प; राम सातपुतेंची टीका
- #Maharashtrabudget2021: यंदाच्या अर्थसंकल्पातून पुण्याला काय मिळाले?
- विधानसभा आणि लोकसभेत महिलांना 33 टक्के आरक्षण मिळाले पाहिजे; आठवले घेणार मोदींची भेट
- ‘अर्थसंकल्पात शेतीला महत्व दिल्याचे स्वागत मात्र कर्जमुक्ती व वीजबिलमाफी बाबत पदरी निराशाच’
- राज्यात दारु महागणार! अर्थसंकल्पात अजित पवारांनी वाढवला कर