‘जर केंद्र सरकारने ओबीसींचा डाटा राज्याला दिला असता तर सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय वेगळा आला असता’

विजय वडेट्टीवार

मुंबई – राज्यात ओबीसी आरक्षणाचा मुद्दा चांगलाच चर्चेत आला आहे. भाजपने या मुद्द्यावरून आक्रमक भूमिका घेतली असून आज अनेक ठिकाणी आंदोलने केली जात आहेत. काही भाजप नेत्यांनी तर थेट मंत्री विजय वडेट्टीवार यांच्या राजीनाम्याची देखील मागणी केली आहे. यानंतर आता वडेट्टीवार यांनी भाजपवर पलटवार केला आहे.

वडेट्टीवार म्हणाले, भाजपचे जे नेते माझ्या राजीनाम्याची मागणी करत आहेत त्यांना हे माहिती नाही की ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचा विषय हा माझ्या खात्याशी संबंधित नसून ग्रामविकास विभागांतर्गत येतो.मी ओबीसी समाजासाठी प्रामाणिक काम करत आहे.ओबीसींचे प्रश्न हे राजकारणाचे मुद्दे नसून जबाबदारीचा विषय आहे.

जर केंद्र सरकारने ओबीसींचा डाटा राज्याला दिला असता तर सर्वोच्च न्यायालयाचा जो निर्णय आला तो वेगळा असता. मुख्य म्हणजे सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाने आता देशातील सर्व राज्यात ओबीसींचे राजकीय आरक्षण धोक्यात आले आहे. महाराष्ट्रात तर सत्तेत असलेल्या पक्षाकडे भाजप बोट दाखवणार. मात्र आता इतर राज्यांमध्ये सुद्धा ओबीसींचे राजकीय आरक्षण धोक्यात आले आहे, त्यामुळे ज्या राज्यांमध्ये भाजपचीच सत्ता आहे तेथे भाजप कोणाकडे बोट दाखवणार ? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.

महत्त्वाच्या बातम्या