आडमुठेपणा धरुन बस बंद ठेवल्यास एसटी कर्मचाऱ्यांचेच नुकसान-अनिल परब

आडमुठेपणा धरुन बस बंद ठेवल्यास एसटी कर्मचाऱ्यांचेच नुकसान-अनिल परब

अनिल परब

मुंबई : गुरुवारी घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत एसटी कामगारांना पगारवाढ करण्याचे जाहीर करण्यात आले. मात्र तरीही एसटी कामगार आंदोलन सुरूच ठेवत आहेत. एसटी कामगार विलीनीकरण करण्याच्या मुद्द्यावर ठाम असल्याचे स्पष्ट दिसत आहे. यावर एसटी महामंडळाचे अध्यक्ष तथा परिवहन मंत्री अनिल परब यांनी कर्मचाऱ्यांना आवाहन केले आहे.

अनिल परब म्हणाले, जे कर्मचारी कामावर आले आहेत, ज्यांनी या आवाहनाला प्रतिसाद दिलाय, त्यांचं स्वागत करतो. जो शासनाने निर्णय घेतलाय तो कर्मचाऱ्यांच्या हिताचा आहे. तरी जर आठमुठेपणा घेऊन, विलीनीकरणावर अडत बसून जर एसटी सेवा ठप्प केली आणि ग्रामीण भागातील प्रवाशांचे हाल केले तर यात एसटीचं आणि कर्मचाऱ्यांचेही नुकसान आहे. असे अनिल परब म्हणाले.

भाजप आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) आणि आमदार सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) यांनी पगारवाढ केल्यानंतर आझाद मैदानावर सुरू असलेले आंदोलन स्थगित करण्याची घोषणा दिली होती. यावर एसटी कर्मचाऱ्यांनी आंदोलन सुरुच ठेवणार असे जाहीर केल्याने गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत यांनी आंदोलनातून बाहेर जात असल्याचे सांगितले आहे.

महत्वाच्या बातम्या