… तर फायदा काँग्रेस-राष्ट्रवादीला – आठवले 

आठवले

टीम महाराष्ट्र देशा- राज्यात भाजप, सेना व आरपीआय एकत्र लढण्यासाठी आपले प्रयत्न सुरू आहेत. शिवसेनेच्या नाराजीबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली आहे.  शिवसेनेने यापुढील निवडणुका स्वतंत्र लढण्याचे जाहीर केले आहे मात्र  तसे झाल्यास त्याचा फायदा काँग्रेस-राष्ट्रवादीला होईल व भाजप-सेनेला सत्तेतून दूर व्हावे लागेल.  शिवसेनेला केंद्रामध्ये मंत्रीपद दिल्यास त्यांची नाराजी दूर होऊ शकते.  भाजप आणि शिवसेनेमधील अंतर दूर करण्यासाठी आपले प्रयत्न सुरू असून लवकरच शिवसेनेची मनधरणी करण्यास यशस्वी होऊ,  असा विश्वास  केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केला आहे .

अखिल भारतीय मराठी संत साहित्य संमेलनासाठी अर्जुनी/मोरगाव येथे आठवले आले होते. त्यानंतर भंडारा येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. २०१९मध्ये नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात एनडीएचे सरकार पुन्हा येणार असल्याचे सांगत आठवले म्हणाले, युती होण्यासाठी आपण दोन्ही पक्षांच्या नेत्यांच्या संपर्कात असून लवकरच शिवसेनेची नाराजी दूर केली जाईल, असे त्यांनी सांगितले.