भाजप-सेनेची युती झाली तर दक्षिण मुंबईतून निवडणूक लढवणार- रामदास आठवले

रामदास आठवले

टीम महाराष्ट्र देशा : केंद्रीय समजकल्याण राज्यमंत्री रामदास आठवले यांनी लोकसभा निवडणूक लढवण्यास उत्सुक असल्याचे सांगितले. आठवले म्हणाले, भाजप-सेनेची युती झाली तर दक्षिण मुंबईतून निवडणूक लढविणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

रामदास आठवले म्हणाले, भाजप-सेनेची युती झाली नाही तर विदर्भातील रामटेक मतदारसंघातून उमेदवार व्हायला आवडेल, असे केंद्रीय समजकल्याण राज्यमंत्री रामदास आठवले यांनी म्हटले आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याशी रामटेक मतदारसंघाच्या अनुषंगाने चर्चा झाली असून भाजप सोबतच निवडणूक लढविणार असल्याच्या घोषणेचा आटवले यांनी पुनरुच्चार केला.

केंद्र सरकार दलित विरोधी नसून सरकारने अॅ ट्रॉसिटी संदर्भात दिलेल्या निर्णयाच्या विरोधात पुनर्विलोकन याचिका दाखल करण्यात आली आहे. तसेच यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुढाकार घेतला असल्याचे आठवले म्हणाले.