‘भाजपवाले मत मागायला आले तर त्यांना मत द्यायचे नाही तर मूत्र पाजायचे’- रविकांत तुपकर

टीम महाराष्ट्र देशा : आपल्या वादग्रस्त विधानांमुळे नेहमी चर्चेत राहणारे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत.सुसंस्कृत आणि स्वाभिमानी स्व.शरद जोशी यांचा वारसा सांगणाऱ्या तुपकर यांनी विरोधकांवर टीका करताना पातळी सोडल्याचं पहायला मिळत आहे. ज्या भाजपला सत्तेत आणण्यासाठी स्वभिमानीच्या नेत्यांनी जीवाचं रान केलं त्याच सरकारला आता सत्तेवरून खेचण्यासाठी तुपकर यांनी खालच्या थराला जाऊन टीका केली आहे.

मंत्रिपद न मिळाल्याने नाराज झालेल्या राजू शेट्टी यांनी ‘एनडीए’ला सोडचिट्ठी दिल्यानंतर स्वभिमानीच्या नेत्यांकडून विशेषतः तुपकर यांच्याकडून अतिशय शिवराळ भाषेत भाजप नेत्यांवर टीका केली जात आहे. अकोला जिल्ह्यातील मुर्तीजापूर येथे सुरु असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनात बोलताना तुपकर यांनी सभ्यतेच्या सर्व परिसीमा ओलांडल्या आहेत.

“या भाजपच्या लोकांनी आपल्याला भाषणे देऊन फसवंल आहे,भाजपवाले आता मत मागायला आले तर त्यांना मत द्यायचे नाही, मूत्र पाजायचे.” अशा खालच्या भाषेत प्रक्षोभक विधान स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी केले आहे.अकोला जिल्ह्यातील मुर्तीजापूर येथे सुरु असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनात ते बोलत होते.

यावेळी शेतकऱ्यांच्या मागण्याचे निवेदन घेण्यासाठी अधिकारी आले नसल्याने रवीकांत तुपकर आक्रमक झाले होते. ‘आता मंत्र्यांच्या गाड्या पेटवून द्या, मीपण येतो पेटवायला’ अशी प्रक्षोभक विधान करून मुक्ताफळे उधळली आहेत.

युती ची वाट न पाहता भाजपा लागला तयारीला. पहा. कोण आहे हा भाजपचा संभाव्य उमेदवार..?

You might also like
Comments
Loading...