भाजपची सत्ता आल्यास मुख्यमंत्री व्हाल का? खडसे म्हणतात…

eknath khadse

टीम महाराष्ट्र देशा : लोकसभा निवडणुकीनंतर आता सर्वच पक्षांनी विधानसभा निवडणुकीवर लक्ष केंद्रित केले आहे. या निवडणुकीविषयी भाजपचे जेष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी विधानसभेला राज्यात भाजप-सेना युतीचंच सरकार येईल यात शंका नसल्याचं विधान केलं आहे.

एका मुलाखतीदरम्यान त्यांनी विधानसभेला राज्यात भाजप-सेना युतीचंच सरकार येईल. भाजपला देशभरात चांगलं वातावरण असून भाजपाचे सर्वाधिक आमदार निवडून यावेत, यासाठी भाजप कार्यकारणी प्रयत्न करत आहे. तसेच २०१९ ला राज्यात भाजपाची सत्ता आल्यास आपण मुख्यमंत्री होणार का? या प्रश्नाला उत्तर देताना मी पक्षाचा कार्यकर्ता असून पक्ष जो आदेश देईल, तो मी पाळेन. पक्षाचा आदेश माझ्यासाठी अंतिम असेन. त्यामुळे पुढचा मुख्यमंत्री कोण हे पक्षश्रेष्ठी ठरवतील असं खडसे यांनी स्पष्ट केलं.

दरम्यान, पुढे बोलताना खडसे यांनी सरकारमधील अनेक मंत्र्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत. त्यामध्ये अनेकांचे पुरावेही प्रथमदर्शनी हाती आले आहेत. मात्र, त्यांच्यावर कारवाई करण्याचं धाडस सरकार दाखवत नाही. पण, नाथाभाऊंवर केवळ आरोप होताच, राजीनामा मागण्याचं षडयंत्र सुरू झालं. यावरुन, मला राजकीय षडयंत्राचा बळी बनविल्याचं म्हटलं आहे.Loading…
Loading...