fbpx

भाजप सत्तेत आलं तरी १३ दिवसात सरकार पडेल : शरद पवार

टीम महाराष्ट्र देशा :  राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी येत्या काळात महायुतीचे सरकार आले तर १३ दिवसात सरकार पडेल असे भाकीत केले आहे. एबीपी माझा या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी म्हंटले आहे.

लोकसभा निवडणुकीनंतर राज्यात विधानसभा निवडणुकीचे वारे सुरु आहे. याचदरम्यान राज्यात दुष्काळाची परिस्थती निर्माण झाल्याने सर्व पक्षांनी जिल्हा दौरे सुरु केले आहेत. त्याचप्रमाणे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनीही दुष्काळ दौरा सुरु केला आहे. याचदरम्यान शरद पवार आणि त्यांचे नातू रोहित पवार यांनी एबीपी माझा या वृत्तवाहिनीला मुलाखत दिली. त्यावेळी त्यांनी राज्यात सत्ता बदल होणार. भाजप–शिवसेनेच्या हातात सत्ता राहणार नाही. आणि जरी सरकार आले तरी ते १३ दिवसांमध्ये पडेल असे भाकीत शरद पवार यांनी केले. इतकेच नव्हे तर भाजप–सेना यांच्या युतीवारूनही त्यांनी टोला लगावला. भाजपा–शिवसेनेची विधानसभेलाही युती होणार,  त्यांना पर्याय नाही. एकाला नवरा मिळत नाही तर एकाला बायको मिळत नाही. गावाकडची अशी म्हण म्हणत त्यांनी युतीला टोला लगावला.

याचबरोबर,  २३ मे रोजी लागणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या निकालावर भाजपने वर्तवलेल्या अंदाजावारही त्यांनी निशाणा साधला भाजपचे गणित चुकतंय, भाजपला ५०० जागा मिळतील असा टोला त्यांनी लगावला. राजस्थान, मध्यप्रदेश, छत्तीसगढ ही राज्य आठ महिन्यांपूर्वी हातातून गेली आहेत यातूनच लोकांचा ट्रेंड काय आहे ते दिसून येतो. असे असतानाही भाजप ५०० – ३०० जागा येतील असे सांगते, याला काही अर्थ नाही. असेही शरद पवार यांनी म्हंटले.