‘थकबाकी वसूल न झाल्यास महाराष्ट्र अंधारात जाण्याची शक्यता!’, उर्जामंत्र्यांनी व्यक्त केली चिंता

nitin raut

नवी-दिल्ली : वीजबिलाची थकबाकी ७९ हजार कोटींच्या घरात जाऊन पोहोचली आहे. त्यामुळे यासंदर्भात राज्याचे उर्जामंत्री नितीन राऊत यांनी चिंता व्यक्त केली आहे. यावेळी ते म्हणाले की, ‘वीजबिल थकबाकीची वेळेवर वसुली झाली नाही तर राज्य अंधारात जाऊ शकते.’ तसेच भाजपा सरकारने थकबाकीचा डोंगर वाढवल्यामुळे महावितरणवर ही वेळ आल्याचा आरोप देखील यावेळी राऊतांनी केला आहे. दरम्यान, आज मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत सह्याद्री अतिथीगृहावर बैठक पार पडली.

यावेळी माध्यमांशी संवाद साधतांना राऊत म्हणाले की,’सरकार आल्यानंतर करोनाचं संकट आलंय. मागच्या सरकारने जो थकबाकीचा डोंगर उभा केला आहे त्याची वसुली, चक्रीवादळे आली, अतिवृष्टी झाली, महापूर आले आणि या सगळ्या संकटांशी झुंजत असताना महावितरणची आर्थिक स्थिती काय आहे याचे विश्लेषण मुख्यमंत्र्यांना करण्यात आले आहे.

दरम्यान, ‘महसूलटंचाई असल्याने वीजखरेदीचे पैसे देण्यास महावितरणला विलंब होत आहे. त्यामुळे विलंब आकाराची तरतूद आहे. त्यामुळे आपल्याकडून घेतलेल्या विजेचे पैसे वेळेत न दिल्याने विलंब आकाराची मागणी चार खासगी वीज कंपन्यांनी केली आहे.’असेही ते म्हणाले.

महत्वाच्या बातम्या