मुंबई : महापालिकेच्या पे आणि पार्किंग योजनेत १०० कोटींचा घोटाळा झाला आहे. असा पालिकेतील विरोधी पक्षनेते रवि राजा यांनी केला आहे. यामुळे मुंबई पालिकेचे (Mumbai Municipal Corporation) नुकसान झाले आहे. मुंबई मनपाच्या ऑनलाईन बैठकीत त्यांनी केला होता. यावर भाजप नेते अतुल भातखळकर यांनी स्पष्टीकरण दिले आहे. सत्ताधारी शिवसेनेचा भ्रष्टाचार महाविकास आघाडीतील मित्रपक्षच उघडकीस आणत असतील तर याचे गांभीर्य वेगळेच ठरते. असे भातखळकर म्हणाले आहेत.
'मुंबई मनपाच्या 'पे अँड पार्क'मध्ये १०० कोटींचा घोटाळा', असा आरोप काँगेसच्या रवी राजा यांनी केला आहे.
महा विकास आघाडीतील मित्रपक्षच जर महापालिकेतील सत्ताधारी शिवसेनेचा भ्रष्टाचार उघडकीला आणत असतील तर त्याचे गांभीर्य वेगळेच ठरते. pic.twitter.com/U0BLglQYAJ— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) January 12, 2022
भातखळकर ट्विटमध्ये म्हणतात, ‘मुंबई मनपाच्या ‘पे अँड पार्क’मध्ये १०० कोटींचा घोटाळा’, असा आरोप काँगेसच्या रवी राजा यांनी केला आहे. महा विकास आघाडीतील मित्रपक्षच जर महापालिकेतील सत्ताधारी शिवसेनेचा भ्रष्टाचार उघडकीला आणत असतील तर त्याचे गांभीर्य वेगळेच ठरते.’, असे ट्विट अतुल भातखळकरांनी केले आहे.
मुंबई शहरात जवळपास २५० पार्किंग सेंट्रल एजन्सी आहेत. ५०० पे आणि पार्किंग ठिकाणं आहेत. यातून मनपाला दरवर्षी शंभर कोटी रुपयांची कमाई अपेक्षित आहे. मात्र संबंधित अधिकारी आणि ठेकेदार यातून आपले खिशे भरत आहेत. यामुळे मुंबई महापालिकेला करोडो रुपयांचे नुकसान होत असल्याचा आरोप रवी राजा यांनी केला आहे.
महत्वाच्या बातम्या
- “…याची भविष्यवाणी या पोपटाने कधीच केली होती”, जितेंद्र आव्हाडांचा भाजपला खोचक टोला
- शरद पवार पंतप्रधान होणार?, नवाब मलिकांनी दिले स्पष्टीकरण
- फडणवीस घरी गेले अन् मायकल लोबोंनी भाजपला सोडचिठ्ठी देत पत्नीसह काँग्रेस प्रवेश केला
- केंद्रीय मंत्री नितीन गडकरी कोरोना पॉझिटिव्ह
- पुन्हा-पुन्हा बुस्टर डोस देणे हे चांगले धोरण नाही; WHO चा इशारा
>>> आमच्या सोशल मीडिया फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील व्हा! फेसबुक & टेलिग्राम ग्रुप <<<
>>> आपल्या परिसरातील महत्त्वाच्या समस्यांना वाचा फोडून, तुमच्या बातमीने बदल घडवा. { बातमी पाठवा SUBMIT NEWS } <<<