‘तस्लीमा नसरीन मोदींची बहीण होऊ शकतात तर मग रोहिंग्या त्यांचे भाऊ होऊ शकत नाहीत का?’ ओवैसी

भारतीय संविधान केवळ नागरिकांनाच नव्हे तर सर्वांनाच समानतेचा हक्क देतो शरणार्थी देखील,

वेबटीम-ज्या प्रमाणे बांगलादेश ,पाकिस्तान,श्रीलंका देशातील निर्वासित भारतात राहू शकतात तर रोहिंग्या नागरिकांना म्यानमार का पाठविले जात आहे.इतरांप्रमाणे त्यांना ही समान वागणूक द्यावी.असे मत एआयएमआयएम चे प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांनी व्यक्त केले.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने  म्यानमारला परत पाठविण्यास सांगितले. इतर शरणार्थी आहेत त्याप्रमाणे यांना देखील  देशामध्ये आश्रय घेण्यास परवानगी नाकारली जाऊ नये.

ओवैसी यांनी १९९४पासून बांगलादेशातील भारतातील वास्तव्य असलेल्या बांगलादेशी लेखक तस्लिमा नसरीन यांचा उल्लेख केला आहे की जर त्या पंतप्रधान मोदींची बहीण असतील तर रोहिंग्या आपल्या ‘बंधू’ असू का असू शकत नाहीत?जर तस्लिमा नसरीन इथे राहू शकतात, तर रोहिंग्या   का नाही राहू शकत नाहीत का? जर तसलीमा पंतप्रधानांची बहीण असू शकली तर, रोहिंग्या आपले भाऊ बनू शकत नाहीत का? असे ओवैसी म्हणाले.

ज्या लोकांना सर्व काही गमावले आहे त्यांना परत पाठवायची आहे का? हे चुकीचे आहे. कोणत्या कायद्यानुसार केंद्राने सर्व रोहगेया शरणार्थींना पाठवले आहे? युनायटेड नेशन्स सिक्युरिटी कौन्सिलमध्ये कायम सदस्यत्व मिळवण्याची भारताच्या इच्छेवरही त्यांनी शंका व्यक्त केली. भारत सरकारने संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत कायमस्वरूपी सदस्यत्व हवे आहे. तर मग अशी वागणूक का दिली जात आहे. केंद्र सरकार त्या मुसलमानांना परत पाठवत आहे.त्या करता मानवाधिकार आयोगाची परवानगी आहे का? ओवैसी म्हणाले. तामिळनाडूत राहणाऱ्या श्रीलंकेच्या शरणार्थींचा उल्लेख करताना ओवैसी म्हणाले की दहशतवाद पसरवण्याचा आरोप केल्यावरही त्यांना भारतात राहाण्याची परवानगी होती.

त्यांनी १९७१ साली भारतात येऊन अरुणाचल प्रदेशमध्ये रहात असलेले बांगलादेशातील चाकमाचे लोक, आणि तिबेटी आध्यात्मिक नेते दलाई लामा यांचाही उल्लेख केला आहे, ज्यांना भारतातील अतिथी म्हणून मानले जाते. भारतीय संविधान केवळ नागरिकांनाच  नव्हे तर सर्वांनाच समानतेचा हक्क देतो शरणार्थी देखील, असे ते म्हणाले.

You might also like
Comments
Loading...