माझ्या बापाला काही झालं असेल तर मी त्याचा जीव घेईन – पंकजा मुंडे

pankaja munde gopinath

टीम महाराष्ट्र देशा – माझ्या बापाला काही झालं असेल तर मी त्याचा जीव घेईन मला कोणत्याही तपास यंत्रणेची गरज नाही,माझ्या बापाला काही झालं असेल तर त्या माणसाचा जीव घेईऩ आणि त्यानंतर माझा जीव जागच्या जागी जाईल असं पंकजा मुंडे म्हटल्या आहेत. केज तालुक्यातील नांदूरघाट येथील आयोजित मतदार संघातील विकास कामाच्या भूमिपूजन कार्यक्रमात त्या बोलत होत्या.

यावेळी पंकजा मुंडे म्हणल्या, लुच्च्या लबाडांना आता मुंडे साहेबांच्या मृत्यूमध्येही राजकारण दिसतं आहे. जयंत पाटील म्हणतात की पंकजा मुंडेंनी राजीनामा दिला पाहिजे कारण मुंडे साहेबांची हत्या झाली. हत्या झाली की नाही हा विषय आता तुमचा नाही. तुम्ही जर चौकशीची मागणी करत असाल तर सुरूवात तुमच्यापासूनच केली पाहिजे.

मी सीबीआय ऑफिसर नाही, मी हॅकर नाही, मी मुंडे साहेबांची लेक आहे. माझ्याविरोधात काही लोक खालच्या पातळीला जाऊन राजकारण करत आहेत. ही बाब चुकीची आहे. इतक्या खालच्या पातळीवर राजकारणात कधीही झालेले नाही असे म्हणत त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर निशाणा साधला आहे.