मुंबई:भाजप नेते मोहित कंबोज (Mohit Kamboj) यांच्या गाडीवर शिवसैनिकांनी काल (२२ एप्रिल) हल्ला केला. मोहित कंबोज उत्तर भारतीय भवन येथे एका कार्यक्रमासाठी गेले असता तेथून परतताना हा हल्ला झाल्याची माहिती समोर येत आहे. ते कलानगर येथील सिग्नलवर थांबले असता मातोश्री बाहेर असलेल्या शिवसैनिकांनी कंबोज यांच्या गाडीवर शिवीगाळ करत हल्ला करण्याचा प्रयत्न केला. यावरच भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) यांच्यावर ताशेरे ओढले आहेत.
“मोहित भारतीय यांच्यावर झालेल्या भ्याड हल्ल्याचा तीव्र निषेध! मुख्यमंत्री शिवसेनेचे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी हल्ला करावा? मातोश्रीसमोर जमून हुल्लडबाजी करावी? मोहित यांना काही झालं असतं तर जबाबदार कोण असतं? असा सवाल करत उद्धवजी आवरा हे! कायदा-सुव्यवस्थेचं बघा जरा. हल्लेखोरांवर कारवाई करा.”, अशी मागणी चंद्रकांत पाटील यांनी केली आहे.
मोहित भारतीय यांच्यावर झालेल्या भ्याड हल्ल्याचा तीव्र निषेध! मुख्यमंत्री शिवसेनेचे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी हल्ला करावा? मातोश्रीसमोर जमून हुल्लडबाजी करावी? मोहित यांना काही झालं असतं तर जबाबदार कोण असतं? उद्धवजी, आवरा हे! कायदा-सुव्यवस्थेचं बघा जरा. हल्लेखोरांवर कारवाई करा!
— Chandrakant Patil (@ChDadaPatil) April 23, 2022
दरम्यान मोहित कंबोज यांच्या गाडीवर हल्ला करताच पोलिसांनी त्या दिशेने धाव घेत परिस्थितीवर नियंत्रण मिळवले. मात्र या घटनेनंतर भाजपकडून अनेक प्रतिक्रिया उमटत असून ठाकरे सरकारला निशाण्यावर धरले जात आहे.
महत्वाच्या बातम्या:
- “त्यांच्या सुसंस्कृतपणाचा मला अभिमान…”; सुप्रिया सुळेंकडून मुख्यमंत्र्यांचे कौतुक
- “सत्तेच्या जीवावर भाजप नेत्यांवर हल्ले…”, ‘त्या’ घटनेवरून राम सातपुतेंचा संताप
- “गृहमंत्री वळसे पाटलांनी आम्हाला शिकवू नये…”, नवनीत राणांचे प्रत्युत्तर
- “कुणाच्या तरी पाठबळानं मातोश्रीत घुसण्याचा प्रयत्न करत असाल तर…”, संजय राऊतांचा राणा दांपत्याला इशारा
- “बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांचे शिवसैनिक असते तर…”, रवी राणांचा शिवसेनेला टोला