कोणी चंपा, टरबुज्या म्हणलं तर खपवून घेऊ नका, पलटवार करा: चंद्रकांत पाटील

fadanvis patil

मुंबई: २०१९ च्या विधानसभा निवडणुकांपासून राजकीय ट्रोलिंगच प्रमाण अधिक झाल्याचं दिसून येत असून हे ट्रोल युद्ध अजूनही सुरु असल्याचं वेळोवेळी समोर येत व त्याची जोरदार चर्चा रंगते. गेल्या निवडणुकांमध्ये भाजपा नेत्यांवर चंपा व टरबुज्या अशी टीका केली जात होती. मात्र याकडे त्यांनी दुर्लक्ष करत आपला प्रचार चालू ठेवला होता. त्यानंतर अचानक महायुतीमधून शिवसेना बाहेर पडली व आकड्यांची जुळवाजुळव करून महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले.

तर, भाजपा विरोधी बाकावर विराजमान झाल्यावर आक्रमक होत वारंवार सरकारला घेरण्याचा प्रयत्न करत आहे. अशात पुन्हा या नेत्यांवर ट्रोलिंग करण्यात आले. काल, भाजपाच्या नव्या प्रदेश कार्यकारिणीची बैठक राज्यभरात व्हिडिओद्वारे पार पडली. यावेळी, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी यापुढे कुठलीही टीका खपवून न घेण्याच्या सूचना भाजप कार्यकर्त्यांना दिल्या आहेत.

दाऊद इब्राहीम प्रकरणातील हॅकरने केले नागपुरातील आमदाराला सावध

महाविकास आघाडी सरकारच्या तीन पक्षांच्या ट्रोलर्सकडून सोशल मीडियावर अर्वाच्च भाषेत आपल्या नेत्यांवर टीका केली जाते. कोणी चंपा म्हणतं, तर कोणी टरबुज्या, मात्र आता कुठल्याही नेत्यावर केलेल्या टीकेला चोख प्रत्युत्तर द्या, असे आदेशच चंद्रकांत पाटील यांनी दिले आहेत. मागील काही दिवसांत चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यावर टीका केली.

राम मंदिर भूमीपूजन सोहळ्याला निमंत्रण मिळालं तरी मी जाणार नाही- शरद पवार

त्याला प्रत्युत्तर म्हणून सोशल मीडियाच्या माध्यमातून महाविकास आघाडीच्या ट्रोलर्सकडून अतिशय खालच्या शब्दात उत्तर देण्यात आले. एका कार्यकर्त्याने तर कुत्र्याची उपमा दिल्याचं चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं. त्यानंतर भाजपची सोशल मीडिया यंत्रणा ऍक्टिव्ह करुन दोन तासात हे वक्तव्य मागे घेण्यास भाग पाडलं, अशा पद्धतीने आक्रमकपणे पलटवार करण्याचा सल्ला चंद्रकांत पाटील यांनी कार्यकर्त्यांना दिला.

पवार बकरी ईदसाठी पुढे पुढे नाचतायत, तर मुख्यमंत्री…भाजपा आमदाराने केली खोचक टीका

इतकंच नाही तर शांत बसणे म्हणजे मान्य केले असे होईल असेही पाटील म्हणाले. याबाबत बोलताना भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनीही राज्यातला आयटी सेल आणखी सक्षम करण्याची गरज असल्याचं अधोरेखित केलं. राज्यात प्रदेश भाजपचे हजारो व्हॉट्सऍप ग्रुप आहेत. मात्र तरीही अपेक्षित असं काम आयटी सेलकडून होताना दिसत नाही, अशा कानपिचक्याही नड्डा यांनी दिल्या. त्यामुळे येत्या काळात भाजप विरुद्ध महाविकास आघाडी सामना सोशल मीडियावर आणखी तीव्र होण्याची चिन्ह दिसत आहेत.