मुंबई : उद्धव ठाकरे सरकारसाठी राज ठाकरे अडचणीचे ठरत आहेत. औरंगाबाच्या सभेत राज ठाकरेंनी घोषणा केली होती की, भोंग्यावर अजान वाजवत असलेल्या मशिदींसमोर हनुमान चालीसा वाजवा. यानंतर ४ तारखेला राज्यभरात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यकर्ते आक्रमक झाले होते. यावेळी शेकडो कार्यकर्त्यांना पोलिसांनी घेतले होते. या सर्व प्रकरणावर रोहित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
राज ठाकरे यांनी मशिदींमध्ये लाऊडस्पीकर वाजवण्याची धमकी दिल्यानंतर राज्याने कायदा आणि सुव्यवस्थेची स्थिती हाय अलर्टवर ठेवली आहे. राज्याचे पोलीस महासंचालक रजनीश सेठ यांनी कोणत्याही बेकायदेशीर घटना टाळण्यासाठी अधिकाऱ्यांना कारवाई करण्याचे आदेश दिले होते. मात्र राज्यात अनेक ठिकाणी शांततेचे वातावरण होते, काही ठिकाणी मुस्लिम बांधवांनी स्वताहून भोंगे लावले नव्हते.
रोहित पवार म्हणाले, “कोणाच्याही चिथावणीला बळी न पडता राज्यात शांतता राखल्याबद्दल राज्यातील जनतेचे आणि पोलीसांचे मनःपूर्वक आभार! महाराष्ट्र आणि इथला सर्व समाज हा शांतताप्रिय आणि सर्वधर्मसमभाव मानणारा आहे, हे पुन्हा एकदा पहायला मिळालं. हा आपला महाराष्ट्र धर्म आणि आपली एकजूट कायम राहील, असा विश्वास आहे.”
“धर्म, निष्ठा, श्रद्धा हे प्रत्येकाचे व्यक्तिगत विषय आहेत. त्याचा आदर सर्वांनीच केला पाहिजे. पण त्याचा कुणी राजकीय बाजार भरवत असेल तर त्यालाही रोखलं पाहिजे. महागाईपासून बेरोजगारी पर्यंत सर्वसामान्यांना भेडसावणारे अनेक प्रश्न आज देशात आहेत. त्यावर आवाज उठवण्याची आज अधिक गरज आहे”, असे रोहित पवार यांनी स्पष्ट केले.
महत्वाच्या बातम्या :