‘यापुढे इमारत दुर्घटनेत कोणी मृत्युमुखी पडले तर..’, उच्च न्यायालयाचा सर्व पालिकांना इशारा

मुंबई : यापुढे कोणत्याही पालिकेच्या हद्दीत इमारत कोसळून नागरिकांचे जीव जाण्याच्या घटना घडतात. अन्यथा अनेक न्यायिक चौकशा लागतील आणि आम्ही तशा चौकशा लावण्याविषयी मागेपुढे पाहणार नाही’, अशा आक्रमक शब्दांत मुंबई उच्च न्यायालयाने आपली भूमिका जाहीर केली.

मुंबई आणि परिसरातील इमारत कोसळण्याच्या घटनांची खंडपीठाने गंभीर दखल घेतली आहे. अशा दुर्घटनांवर तीव्र संताप व्यक्त करत कोर्टाने नाराजी व्यक्त केली. तसेच मालाडमधील गुरुवारच्या इमारत दुर्घटनेच्या प्रकरणाची न्यायालयीन चौकशी करण्याचा आदेशही मुंबई हायकोर्टाने दिला आहे.

‘कालच्या मालाड घटनेमध्ये आठ निष्पाप मुलांचा मृत्यू झाला. आम्ही इथे करोनाच्या प्रश्नावर सुनावणी घेताना लहान मुलांच्या संदर्भात काळजी घेण्याविषयी तीव्र चिंता व्यक्त करून त्यासाठी पावले उचलण्यास सांगत आहोत आणि या घटनेत आठ लहान मुलांचा मृत्यू झाला, हे अत्यंत दुर्दैवी आहे. या घटनेत ११ मृत्यू झाला आहे. त्यामुळे या प्रकरणात न्यायिक चौकशीचे आदेश का देऊ नयेत?’ असे म्हणत खंडपीठाने संताप व्यक्त केला.

आदेश देऊनही कारवाई नाही
इमारती कोसळून लोकांचे जीव जात आहेत. हे सर्व मानवाने निर्माण केलेले संकट आहे. आतापर्यंत कोर्टाने किती वेळा आदेश दिले आहेत, राज्य सरकार आणि महापालिकांना यासंदर्भात योग्य ती कार्यवाही करण्याचे… तरीही घटना घडत आहेत असे म्हणत खंडपीठाने मुंबई पालिकेच्या वकिलांना धारेवर धरले.

महत्वाच्या बातम्या

IMP