ठरलं तर मग…मनसेचे उमेदवार राष्ट्रवादीच्या चिन्हावर निवडणूक लढवणार

टीम महाराष्ट्र देशा : राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची वाढती जवळीकता महाराष्ट्राच्या राजकारणात चर्चेचा विषय ठरत असतानाच आता त्यामध्ये अधिक भर पडली आहे. रायगडमधील कर्जत नगरपरिषदेसाठी मनसेचे उमेदवार हे राष्ट्रवादीच्या चिन्हावर निवडणूक लढवणार असल्याचं मनसेचे जिल्हाध्यक्ष जितेंद्र पाटील यांनी जाहीर केल आहे.त्यामुळे राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि मनसे राज्यपातळीवर उघडपणे एकत्र आले नसले तरी स्थानिक राजकारणात एकत्र येत असल्याचे यानिम्मिताने दिसत आहे.

कर्जत नगरपरिषदेच्या निवडनुकीत रंगत यायला लागली आहे.योगायोगाने मकरसंक्रात याचदरम्यान आल्याने राष्ट्रवादी आणि मनसे नेत्यांमध्ये तिळगुळाचा गोडवा वाढताना दिसत आहे.या निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेस,मनसे आणि एसआरपी या पक्षाने महाआघाडी केली आहे.मनसेने सुरुवातीला सर्व १८ जागांवर निवडणूक लढवणार असल्याचे जाहीर केले होते मात्र अर्ज भरताना मनसेचे पदधिकारी आणि राष्ट्रवादी एसआरपीचे पदधिकारी एकत्र आल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या.

Loading...

यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेस,मनसे आणि एसआरपी यांनी एकत्र पत्रकार परिषद घेतली.व त्यामध्ये मनसे जिल्हाध्यक्षांनी आम्ही महाआघाडीत शामील झालो असून मनसे फक्त एकाच जागेवर निवडणूक लढवणार आहे व तीही राष्ट्रवादीच्या चिन्हावर लढवली जाईल असेही त्यांनी यावेळी जाहीर केले.

दरम्यान, राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार प्रतिक्षा सुरेश लाड यांनी मकरसंक्रांतीच्या शुभेच्छा देण्यासाठी तयार करण्यात आलेल्या पत्रकामध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या बाजूला मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचा फोटो टाकला असून त्यानंतर राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या व या महाआघाडीतील सर्व उमेदवारांच्या फोटो टाकल्या आहेत. त्यामुळे कर्जतच्या राजकारणात एकत्र आलेले हे दोन पक्ष येणाऱ्या लोकसभा-विधानसभा निवडणुकीत राज्यपातळीवरही एकत्र येतील का हे बघावे लागणार आहे.

 

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

बाळासाहेब थोरातांचा स्वबळाचा नारा
पंतप्रधान मोदी छत्रपती शिवाजी तर शहा तानाजींच्या रुपात; शिवसेनेच्या ढाण्या वाघाची पहिली प्रतिक्रिया
कोणाशीही आणि कशीही युती करेन पण एकदा दिल्लीला जाणारच : महादेव जानकर
राज ठाकरे बाळासाहेबांचे स्वप्न पूर्ण करायला मैदानात उतरत असतील तर त्यांचे स्वागतचं...
येवले चहामध्ये भेसळ असल्याचे सिद्ध, अन्न आणि औषध प्रशासनाचा दणका
मुस्लिमांच्या आग्रहामुळे शिवसेनेसोबत सत्ता स्थापन केली?
'झारखंड निवडणुकीवेळी धोनीनं भाजपात प्रवेश न केल्याने BCCIने करारातून वगळले'
मंत्री अशोक चव्हाण यांचा खरा चेहरा उघड; रयत क्रांतीकडून टीका
कोकणातलं राजकारण पेटलं;नाईक - राणे भिडले
तर शिवसेनाही स्वबळावर लढायला तयार; सर्व ११५ जागा लढवणार