शिवसेनेला वाचवायचे असेल, तर मुख्यमंत्री ठाकरेंनी सरकारच्या बाहेर पडावं- रामदास आठवले

uddhav-ramdas

मुंबई : केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले हे नेहमीच आपल्या वक्तव्यांमुळे चर्चेत असतात. तसेच आता पुन्हा एकदा ते मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या संदर्भात केलेल्या वक्तव्यामुळे चर्चेत आले आहेत.

यासंदर्भात पत्रकारांशी बोलतांना ते म्हणाले की,’मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे मुंबईच्या बाहेर पडत आहेत ही चांगली गोष्ट आहे. पण त्यांनी फक्त मुंबईच्या बाहेर न पडता सरकारच्या बाहेर पडावं’. असे खळबळजनक वक्तव्य आठवले यांनी केले आहे. तसेच पुढे ते म्हणाले की,’सरकारच्या बाहेर पडून त्यांनी भाजप आणि आरपीआयसोबत यावं. शिवसेना वाचवायची असेल तर त्यांनी आपल्या निर्णयात बदल करणं आवश्यक आहे. अडीच-अडीच फॉर्म्युलावर सेना-भाजप एकत्र येऊ शकतात’.

दरम्यान, ठाकरेंवर टोलेबाजी केल्यानंतर आठवले यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्यावर देखील प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की,’हे सरकार एकमेकांवर कुरघोडी करणारे सरकार आहे. एकमेकांवर हल्ले-प्रतिहल्ले केले जात आहेत. तुम्ही एकत्र आला आहात तर तुम्ही शांतपणे राज्याचा कारभार करा. लोकांच्या प्रश्नाकडे लक्ष द्या. लोकांचे प्रश्न बाजूला राहिले आणि त्यांचे लक्ष पंतप्रधान नरेंद्री मोदींकडे आहे. नरेंद्र मोदींवर काहीतरी आरोप करायचा आणि त्यातच आपलं समाधान मानतात. हे सरकार जावं आणि आमचे महायुतीचे सरकार यावे,’ असेही ते म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या