‘शरद पवार मुख्यमंत्री होणार असतील तर मी राजीनामा देण्यास तयार’

टीम महाराष्ट्र देशा : सध्या राज्यात भाजप शिवसेनेत सत्ता वाटपासाठी जोरदार संघर्ष सुरु आहे. अशातच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पक्षाच्या महत्त्वाच्या नेत्यांची बैठक बोलावली होती. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधान आले आहे. ही बैठक पार पडल्यानंतर राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी मुख्यमंत्री पदाबाबत मोठ वक्तव्य केलं होत.

‘याआधीही विधीमंडळाचा सदस्य नसलेली व्यक्ती मुख्यमंत्री झालेली आहे. मग कोणी राज्यसभेचा सदस्य असेल, कुणी लोकसभेचा, असं अजित पवार म्हणाले आहेत. त्यामुळे राज्यसभेचे सदस्य असलेले शरद पवार मुख्यमंत्री होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. तसेच राष्ट्रवादी आणि शिवसेनेने सत्ता स्थापन केल्यास आदित्य ठाकरेंना उपमुख्यमंत्रीपद मिळू शकते.

यावरून आता जुन्नरचे नवनिर्वाचित आमदार अतुल बेनके यांनी शरद पवारांसाठी आपल्या आमदारकीचा राजीनामा देण्याची तयारी दर्शविली आहे. “मागील पाच वर्षांत राज्यातील शेतकरी देशोधडीला लागला आहे. ज्येष्ठ नेते शरद पवार हेच बळिराजाला न्याय देऊ शकतात. सध्याच्या राजकीय स्थितीत शरद पवार मुख्यमंत्री झाल्यास त्यांच्यासाठी जुन्नर विधानसभा सदस्यपदाचा राजीनामा देण्यास मी तयार आहे,” असे मत आमदार अतुल बेनके यांनी व्यक्त केले आहे.

दरम्यान, “शरद पवार मुख्यमंत्री झाल्यास दिशाहीन झालेल्या शेतीव्यवसायाला दिशा मिळणार आहे. जुन्नर तालुक्याच्या विकासात त्यांचे मोठे योगदान आहे. पवार मुख्यमंत्री झाल्यास त्यांच्यासाठी आमदारकीचा राजीनामा देण्याचा निर्णय मी घेतला आहे. पवार मुख्यमंत्री होवो अन् राजीनामा देण्याचे भाग्य मला लाभो, अशी प्रार्थना मी विघ्नहर्त्याच्या चरणी केली आहे.” अस बेनके म्हणाले आहेत.

महत्वाच्या बातम्या