शरद पवार पंतप्रधान व्हावे हि मनसेचीही इच्छा : नांदगावकर

कऱ्हाड : ‘राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे जर पंतप्रधान झाले तरी उत्तमच होईल,भारताचा पंतप्रधान मराठी माणूस व्हावा, अशी सर्वांची ज्याप्रमाणे इच्छा आहे तशी मनसेचीही आहे असं वक्तव्य मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी व्यक्त केले.बाळा नांदगावकर पश्चिम महाराष्ट्र दौऱ्यावर आले असताना बुधवारी कऱ्हाड येथे शासकीय विश्रामगृहावर माध्यमांशी संवाद साधताना ते बोलत होते.
नुकतीच मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची मुलाखत घेतली होती त्यानंतर मागील काही दिवसांपासून मनसे आणि राष्ट्रवादीमध्ये जवळीक वाढत असल्याचं समोर येत आहे. या पार्श्वभूमीवरनांदगावकर यांनी शरद पवार यांच्यावर स्तुतिसुमने उधळली. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे जर पंतप्रधान झाले तरी उत्तमच होईल,भारताचा पंतप्रधान मराठी माणूस व्हावा, अशी सर्वांची ज्याप्रमाणे इच्छा आहे तशी मनसेचीही आहे असं ते म्हणाले. राज ठाकरे यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची मुलाखत घेतल्यानंतर मुलाखत घेण्यामागे काही राजकारण असल्याच्या चर्चा केल्या जाऊ लागल्या. मात्र, मुलाखतीचा राजकारणाशी काहीही संबंध नाही, असे स्पष्टीकरण मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी दिले.