‘देशात हिंदूंचे हाल होतायेत, संभाजी भिडे पंतप्रधान झाले तरचं हिंदू धर्म वाचेल’

SAMBHAJI-BHIDE-GURUJI

टीम महाराष्ट्र देशा : श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्यावतीने काढण्यात येणाऱ्या दुर्गामाता दौडीची आज सांगता झाली. या सांगता समारंभाला हजारो धारकऱ्यांनी उपस्थिती दर्शवली. या कार्यक्रमात करणी सेनेचे राज्य अध्यक्ष अजयसिंह सिंगर यांनी सध्या देशातील हिंदूंचे फार हाल सुरु आहेत. संभाजी भिडे गुरुजींसारखे पंतप्रधान मिळाले तरचं हिंदू धर्म वाचेल असं विधान केले आहे.

गेली नऊ दिवस सुरू असणाऱ्या श्री शिवप्रतिष्ठानच्या दुर्गामाता दौडीची आज विजयादशमी दिवशी सांगता होते. यात हजारो धारकरी धावत असतात. या कार्यक्रमात बोलताना करणी सेनेचे राज्य अध्यक्ष अजयसिंह सिंगर यांनी सध्या देशातील हिंदूचे फार हाल सुरू आहेत. संभाजी भिडे गुरुजी हेच हिंदू धर्माचे खरे धर्मगुरु आहेत. संभाजी भिडे गुरुजींसारखे पंतप्रधान मिळाले तरच हिंदूधर्म वाचेल असं विधान केले आहे.

Loading...

दुर्गामाता दौड ही गेल्या ३६ वर्षांपासून निघत आहे. 30 सप्टेंबरपासून सांगलीसह संपूर्ण राज्यात श्री दुर्गामाता दौड सुरू होती. आज दसऱ्याच्या दिवशी या दौडीचा समारोप करण्यात आला. या दौडीचा समारोप होतेवेळी धारकऱ्यांनी ‘जयभवानी-जयशिवाजी च्या जोरदार जयघोषाने परिसर दणाणून सोडला होता. डोक्याला फेटा किंवा गांधीटोपी घालून दौडीत शिवभक्त सहभागी झाले होते.

दरम्यान, या कार्यक्रमासाठी संभाजी भिडे, धैर्यशील माने, सुधीर गाडगीळ, अजयसिंह सिंगर यांच्यासह शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या पदाधिकाऱ्यांनी उपस्थिती दर्शवली. यांच्यासह हजारो धारकऱ्यांनी उपस्थिती दर्शवली.

महत्वाच्या बातम्या 

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

आणि... अजित दादांमुळे मुख्यमंत्र्यांवर ओढविणारी नामुष्की टळली
अभिमान आहे सर तुमचा : संपूर्ण शहरात दहशत असणाऱ्या गुंडाच्या अनधिकृत बंगल्यावर मुंढेंचा हातोडा
'भाजप-सेनेनं एकत्र यावं, मिळून सरकार स्थापन करु' ; NDAच्या बड्या नेत्याचं आवाहन
मनसेच्या रणरागिणीचं तृप्ती देसाईंना खुले आव्हान, तू येच...
गृहमंत्री अमित शाह यांनी तातडीने राजीनामा द्यावा ,सुप्रिया सुळेंची मागणी
'बोकड बांधा लागते, मसाले आणा लागते, गावात तेव्हा लोक 'मतदान' करतात' : बच्चू कडू
फडणवीस साहेब कदाचित आपला गजनी झालायं - रुपाली चाकणकर
बालेकिल्ल्यात भाजपला धक्का; मेहतांनी कॉंग्रेस-राष्ट्रवादी-सेनेची माफी मागत भाजप सोडली
'पाच वर्षे सत्तेत राहून पराभव झाला मात्र, मी पराभूत झाल्याचा सर्वात जास्त आनंद माझ्या मुलाला झाला'
राज्य सरकारला 'मोठा धक्का' ; अध्यादेश काढायला राज्यपालांनी नकार दिल्यामुळे आली नामुष्की