फक्त आरक्षणामुळे देशाचे भले होणार नाही : सुमित्रा महाजन

टीम महाराष्ट्र देशा- देशाच्या सामाजिक रचनेत आणि मागासवर्गातील कुटुंबांच्या स्थितीत बदल घडवण्यासाठी आरक्षण पुरेसे नाही, असे रोकठोक मत लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी व्यक्त केले आहे. रांची येथे ‘लोकमंथन २०१८’ चे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमात बोलताना महाजन यांनी हे वक्तव्य केलं आहे.

नेमकं काय म्हणाल्या सुमित्रा महाजन?
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्वत: असे म्हटले होते की देशात आरक्षण फक्त १० वर्षांसाठी दिले पाहिजे. दहा वर्षांत देशात समान विकास होईल असा त्यांचा अंदाज होता. पण दुर्दैवाने तसे घडले नाही. संसदेने दरवेळी आरक्षणाची कालमर्यादा वाढवली. देशातील सामाजिक सलोख्यासाठी आपण डॉ. आंबेडकरांच्या विचारांचे अनुकरण केले पाहिजे.देशाच्या सामाजिक रचनेत आणि मागासवर्गातील कुटुंबांच्या स्थितीत बदल घडवण्यासाठी आरक्षण पुरेसे नाही. मात्र, हे माझे वैयक्तिक मत आहे.देशात महिलांचा आदर केला जात नाही. त्यामुळे देश पुढे जात नाही. महिला मागे राहिल्या तरी देशाचीही प्रगती होणार नाही.