राणे भाजपमध्ये आले तर सत्तेत राहण्याचा निर्णय उद्धव ठाकरे घेतील – नीलम गोऱ्हे

सोलापूर : कोकणातल्या माणसाला बाळासाहेबांनी मुख्यमंत्री केले. ज्यांना मुख्यमंत्री केले त्यांना स्मरण आहे की नाही माहिती नाही. नारायण राणेंनी भाजप प्रवेश केला तर सत्तेत राहायचे की नाही याचा निर्णय उद्धव ठाकरे घेतील, असे वक्तव्य शिवसेना नेत्या आमदार नीलम गोऱ्हे यांनी व्यक्त केले.

नीलम गोऱ्हे सोलापुरात आल्या असता पत्रकारांशी बोलत होत्या. समान नागरी कायदा ही बाळासाहेब ठाकरे यांची मागणी होती. तलाक हे समान नागरी कायद्याचे पहिले पाऊल आहे. समान नागरी कायदा आणि त्याबाबातच्या दुरुस्त्यांना किमान दहा वर्ष कालावधी लागेल. मात्र तलाक संबंधी न्यायालयाने घेतलेला निर्णय आणि भाजप सरकारची असलेली सकारात्मक भूमिका ही समान नागरी कायद्याचे पहिले पाऊल असल्याचे यावेळी गोऱ्हे म्हणाल्या.