राजमुद्रेचा वापर केला तर कायदेशीर लढाई लढणार : विनोद पाटील

औरंगाबाद : राज्यातील बदललेल्या नव्या राजकीय समिकरणानंतर सर्वच पक्षांतर्गत बदलास सुरुवात झालेली दिसत आहे. नव्या राजकीय समीकरणामध्ये अस्तित्त्वासाठी धडपडणाऱ्या मनसेनेही कात टाकण्यासाठी प्रयत्न सुरु केला आहे. उद्या मुंबईमध्ये होणाऱ्या मनसेच्या अधिवेशनात पुन्हा उभारी घेण्यासाठी नेते व कार्यकर्त्यांना बळ मिळणार अशी आशा करीत आहेत. सोबतच पक्षाचा नवा झेंडा आणि पक्षाची पुढील ध्येय धोरणे आणि विचारधारा ही मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडून स्पष्ट केली जाण्याची शक्यता आहे. तत्पुर्वीच मनसेचा नवा झेंडा फडकण्यापुर्वीच वादात सापडण्याची चिन्हे आहेत.

मनसेच्या नव्या झेंड्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजमुद्रेचा वापर केला जाणार आहे. त्यामुळे मराठा समाजाकडून न्यायालयीन लढाई लढणारे आणि आर. आर. पाटील फाऊंडेशनचे अध्यक्ष विनोद पाटील यांनी राजमुद्रेचा वापर केला तर कायदेशीर लढाई लढण्याचा निर्धार केला आहे. जर मनसेने राजमुद्रेचा वापर केला तर केंद्र, राज्य सरकारसोबतच निवडणूक आयोगाला पत्र देण्यात येणार असल्याचे विनोद पाटील यांनी सांगितले आहे.

Loading...

राज्यात कोणीही विचार केला नसतानाही नवीन सत्तासमीकरण उदयास आले. जे पक्ष विरोधात बसतील अशी शक्यता होती, त्या पक्षांनी सत्तेचे मैदान मारले. त्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनाही नव्या भूमिकेत समोर येण्यास सज्ज झाली आहे. नव्या भूमिकेसह मनसे आपला झेंडा देखील बदलत आहे. मनसेच्या नव्या झेंड्यावर छत्रपती शिवाजी महाराजांची राजमुद्रा घेण्यात येणार असल्याची चर्चा आहे. त्यामुळे वाद निर्माण झाला आहे. मराठा आरक्षणाचा न्यायालयीन लढा लढणारे विनोद पाटील या विरोधात न्यायालयात जाणार असल्याचे समजते.

तत्पूर्वी केंद्र सरकार, राज्य सरकार आणि निवडणूक आयोग याना विनंती करणारे पत्र देण्यात येणार आहे. या पत्रात राजमुद्रेचा वापर कोणीही करू नये, कोणीही शिवरायांच्या राजमुद्रेचा वापर टाळावा यासाठी सरकारने ठोस भूमिका जाहीर करावी, अशी मागणी करण्यात येणार आहे.

राष्ट्रीय अवमान प्रतिबंध कायदा- 1971′ मध्ये समावेश करावा

शिवाय राज्य आणि केंद्र सरकारने शिवरायांच्या राजमुद्रेचा अवमान कधीही होऊ नये, कोणी करू नये म्हणून राजमुद्रेचा समावेश राष्ट्रीय अवमान प्रतिबंध कायदा- 1971′ मध्ये समावेश करावा अशी मागणी करण्यात येणार आहे. आज संध्याकाळपर्यंत याबाबतचे पत्र पाठवण्यात येणार आहेत. राजमुद्रा हे छत्रपती शिवाजी महाजारांचे प्रतीक आहे. त्यामुळे कोणीही शिवाजी महाराजांच्या राजमुद्रेचा वापर राजकारणासाठी करू नये, अशी विनोद पाटील यांनी मागणी केली आहे. आठवडाभरापूर्वी विनोद पाटील यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना विनंतीपत्रही पाठवले होते. मात्र त्याचे काहीही उत्तर मिळाले नाही. त्यामुळे आता टप्प्याटप्प्याने न्यायालयीन लढाई लढण्याचा निर्धार विनोद पाटील यांनी केला आहे.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

टीकाकारांच्या नाकावर टिच्चून इंदुरीकर महाराजांची मोशीत काढली मिरवणूक
शिवसेनेचा 'ढाण्यावाघ' ऊझबेकिस्थानात
'पुन्हा निवडणुका झाल्यास भाजपाच्या आमदारांची संख्या १०५ वरुन पंधरावर येईल'
इंदोरीकर महाराजांच्या 'त्या' वक्तव्यावर सिंधुताई सपकाळांची लक्ष्यवेधी प्रतिक्रिया
फक्त विधानसभा कशाला लोकसभेच्या देखील निवडणुका घ्या, पवारांनी फडणवीसांना ललकारलं
इंदुरीकर महाराज समर्थकांकडून तृप्ती देसाईंचे होणारे चारित्र्यहनन महिला प्रतिनिधींना दिसत नाही का?
परळीतील 'त्या' प्रकरणातील आरोपींना अटक, कोणाचीही गय केली जाणार नाही - धनंजय मुंडे
मनसेच्या रणरागिणीचं तृप्ती देसाईंना खुले आव्हान, तू येच...
राजकीय भूकंपाची शक्यता ; भाजपच्या २५ नाराज आमदारांची बैठक
‘सामना’मध्ये छापून आलेल्या नाणार प्रकल्पाच्या जाहिरातीवर मुख्यमंत्री ठाकरेंनी केली भूमिका स्पष्ट, म्हणाले...