‘राज ठाकरेंचे पहिलेच ऐकले असते तर असे अनेक गुन्हे झालेच नसते’

AVINASH JADHAV

मुंबई: साकीनाका प्रकरणानंतर ‘परप्रातीयांची नोंद ठेवा’ असा आदेश मुख्यमंत्री ठाकरेंनी राज्यातील पोलीस यंत्रणेला दिला आहे. यावरूनच मनसे नेते अविनाश जाधव यांनी राज ठाकरेंची सूचना अगोदरच मान्य केली असती तर, अनेक गुन्हे झालेच नसते. असे म्हटले आहे.

दरम्यान मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सतत परप्रांतीयांची माहिती ठेवण्याची मागणी केली होती. राज्यात परप्रांतीय कोठून येतात, ते कोठे वास्तव करतात याची कोणतीच माहिती नसते. मात्र यासंबंधी पोलीस यंत्रणेकडे रेकॉर्ड असायला हवा. अशी मागणी राज ठाकरे यांनी सतत केली होती. याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री ठाकरेंनी हा मोठा निर्णय घेतला आहे. आता माता-भगिनींची टिंगल-टवाळी खपवून घेणार नाही. त्यांच्या सुरक्षेच्या उपाययोजनांमध्ये तडजोड होणार नाही. अशा नराधमांना वचक बसवा, असे मुख्यमंत्री ठाकरेंनी महिला व बालकांच्या सुरक्षेकरता आयोजित गृहविभागाच्या आढावा बैठकीत म्हटले आहे.

तर भाजपचे अतुल भातखळकर यांनी ‘परप्रातीयांची नोंद ठेवा’ हा आदेश म्हणजे समाजात तेढ निर्माण करणारा आहे, असा आरोप करत त्यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांच्याविरोधात तक्रार दाखल केली आहे.

महत्वाच्या बातम्या