राहुल गांधी जर तुमच्यात हिम्मत असेल तर … मोदींचे खुले आव्हान

मोदी

टीम महाराष्ट्र देशा : लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने देशातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांना खुले आव्हान दिल आहे.

झारखंडमधील सभेत बोलताना मोदींनी ‘जर काँग्रेसच्या नेत्यांमध्ये, राहुल गांधींमध्ये हिंमत असेल तर निवडणुकीतील पुढचे दोन्ही टप्पे राजीव गांधींच्या मान-सन्मानाच्या मुद्द्यावर निवडणूक लढवावी असं आव्हान दिलं आहे. ‘बोफोर्स भ्रष्टाचाराचं नाव घेतलं तर काँग्रेसमध्ये वादळ आलं. राजीव गांधींचे नाव घेतलं तर त्यांच्यात पोटात इतकं दुखू लागलं की जोरजोरात रडू लागलेत. मात्र ते जेवढं रडतील तेवढे सत्यही लोकांसमोर येईल. हीच माणसं मर्यादेच्या पलीकडे जाऊन पंतप्रधानांना शिव्या देत होते’ असंही मोदी पुढे बोलताना म्हणाले.

Loading...

दरम्यान, लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात राहुल गांधी यांच्याकडून नरेंद्र मोदींवर राफेल घोटाळ्याचा आरोप केला जात आहे. तर मोदी यांनी पलटवार करत राजीव गांधी यांचा जीवनप्रवास भ्रष्टाचारी नंबर वन अशा रुपात संपल्याची टीका केली होती. त्यामुळे मोदींवर जोरदार टीका झाली आहे.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

टीकाकारांच्या नाकावर टिच्चून इंदुरीकर महाराजांची मोशीत काढली मिरवणूक
शिवसेनेचा 'ढाण्यावाघ' ऊझबेकिस्थानात
'पुन्हा निवडणुका झाल्यास भाजपाच्या आमदारांची संख्या १०५ वरुन पंधरावर येईल'
इंदोरीकर महाराजांच्या 'त्या' वक्तव्यावर सिंधुताई सपकाळांची लक्ष्यवेधी प्रतिक्रिया
मनसेच्या रणरागिणीचं तृप्ती देसाईंना खुले आव्हान, तू येच...
फक्त विधानसभा कशाला लोकसभेच्या देखील निवडणुका घ्या, पवारांनी फडणवीसांना ललकारलं
इंदुरीकर महाराज समर्थकांकडून तृप्ती देसाईंचे होणारे चारित्र्यहनन महिला प्रतिनिधींना दिसत नाही का?
परळीतील 'त्या' प्रकरणातील आरोपींना अटक, कोणाचीही गय केली जाणार नाही - धनंजय मुंडे
राजकीय भूकंपाची शक्यता ; भाजपच्या २५ नाराज आमदारांची बैठक
‘सामना’मध्ये छापून आलेल्या नाणार प्रकल्पाच्या जाहिरातीवर मुख्यमंत्री ठाकरेंनी केली भूमिका स्पष्ट, म्हणाले...