‘राहुल गांधींनी ‘हे’ केल्यास काँग्रेसचे प्रश्न दूर होतील’, शिवसेनेचा काँग्रेसला सल्ला

मुंबई : उत्तर प्रदेशातील नेते जितीन प्रसाद यांच्या भाजप प्रवेशानंतर काँग्रेसमधील खदखद पुन्हा एकदा बाहेर आली आहे. राजकीय विश्लेषकांकडून काँग्रेसच्या भवितव्याची चर्चा पुन्हा एकदा सुरू झाली आहे. काँग्रेसचा राज्यातील मित्र पक्ष शिवसेनेनं देखील काँग्रेसच्या सद्यस्थितीवर चिंता व्यक्त करताना पक्षाला काही सल्ले दिले आहेत.

महाराष्ट्र, कर्नाटक, केरळ वगळता काँग्रेस आपल्या अस्तित्वासाठी झुंज देत आहे. त्यामुळे आता राहुल गांधी यांना पक्षात त्यांची एक मजबूत टीम तयार करावीच लागेल. तेच काँग्रेसपुढील प्रश्नचिन्हाचे ठोस उत्तर ठरू शकेल, असा सल्ला शिवसेनेनं दिला आहे. शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनाच्या अग्रलेखातून काँग्रेस पक्षाबद्दल भाष्य करण्यात आलं आहे.

सचिन पायलट यांची खदखद
राजस्थानात सचिन पायलट यांनी आता पक्ष नेतृत्वास निर्वाणीचा इशारा दिला आहे. सचिन पायलट व त्यांचे समर्थक केव्हापासून अस्वस्थ आहेत व त्यांचा एक पाय बाहेर आहेच. सचिन पायलट यांनी वर्षभरापूर्वी बंडच केले होते. ते कसेबसे थंड केले तरी आजही खदखद सुरूच आहे.

काँग्रेसची आपल्या अस्तित्वासाठी झुंज सुरू
काँग्रेस हा आजही देशातील प्रमुख राष्ट्रीय तसेच विरोधी पक्ष आहे. काँग्रेसने स्वातंत्र्यपूर्व काळात आणि स्वातंत्र्योत्तर काळातही उत्तम काम केले. आज देश जो उभा आहे तो घडविण्यात काँग्रेस राजवटीचे योगदान आहे. आजही जगाच्या पाठीवर ‘नेहरू-गांधी’ ही देशाची ओळख पुसता आलेली नाही. मनमोहन सिंग, नरसिंह राव, इंदिरा गांधी, राजीव गांधी यांचा ‘ठसा’ कोणाला पुसता आलेला नाही. हेच काँग्रेसचे भांडवल आहे, पण महाराष्ट्र, कर्नाटक, केरळ वगळता काँग्रेस आपल्या अस्तित्वासाठी झुंज देत आहे. देशाचा राजकीय समतोल बिघडविणारे हे चित्र आहे.

काँग्रेसमध्ये पोकळी निर्माण
अहमद पटेल, राजीव सातव यांच्या निधनाने आधीच काँग्रेसमध्ये पोकळी निर्माण झाली आहे. त्यात त्या पक्षातील काही तरुण नेत्यांनी भाजपचा मार्ग स्वीकारला हे बरे नाही. काँग्रेस हा आजही देशभरात जनमानसात मुळे घट्ट रुजलेला पक्ष आहे.

महत्वाच्या बातम्या

IMP