पुण्याला तर जाणारच, सभेला परवानगी न दिल्यास पायीयात्रा काढणार – आझाद

मुंबई: भीम आर्मीचे संस्थापक चंद्रशेखर आझाद उर्फ रावण यांच्या पुण्यातील सभेला परवानगी नाकरण्यात आली आहे. मात्र तरीही आपण पुण्याला जावून सभा घेणारच असा निर्धार आझाद यांनी बोलून दाखवला आहे. भीमा कोरेगाव शौर्य दिनाच्या निमित्ताने आझाद यांच्या सभेच पुण्यामध्ये आयोजन करण्यात आल आहे. परंतु खबरदारीचा उपाय म्हणून पोलिसांनी सभेला परवानगी नाकारली आहे.

दरम्यान, सरकार संविधान विरोधी काम करत असून आपण त्याला न्यायलयामध्ये आव्हान देणार असल्याचं आझाद यांनी सांगितल आहे. मला कितीही अडवण्याचा प्रयत्न झाला तरी चैत्यभूमी आणि भीमा-कोरेगाव येथेही जाणार असल्याचं चंद्रशेखर आझाद यांनी स्पष्ट केल आहे. तसेच पोलिसांनी सभेला परवानगी न दिल्यास पुणे ते भीमा कोरेगाव पायीयात्रा काढणार असल्याचंही त्यांनी सांगितले.

1 Comment

Click here to post a commentLoading…
Loading...