खाजगी शिकवण्या सुरु असतील तर फौजदारी कारवाई करण्यात येईल – बच्चू कडू

Bachhu Kadu

अमरावती : कोरोना विषाणूचा संसर्ग वाढत असल्याने शाळा महाविद्यालय बंद आहेत. सरकार येणाऱ्या काळात शाळा सुरू करण्याबाबत विचाराधीन असली तरी सद्या कोरोनाचे वाढत असलेले संक्रमण बघता, शिक्षकांनी खाजगी शिकवणी सुरू केल्याचं दिसतंय.

ऑनलाईन प्रणाली वगळता, विद्यार्थ्यांना एकत्र बसवून खाजगी शिकवणी होत असल्याचा प्रकार पु़ढे येत आहे. यामध्ये कुठेही सामाजिक अंतर पाळले जात नाही आहे. त्यामुळे अशी शिकवणी होताना आढळल्यास त्यांच्यावर फौजदारी कारवाई करण्यात येईल असा इशारा राज्यमंत्री बच्चू कडू यांनी खाजगी शिकवणी करणाऱ्या शिक्षकांना दिलाय.

पहा काय म्हणाले बच्चू कडू :

खाजगी शिकवण्या सुरु असतील तर फौजदारी कारवाई करण्यात येईल – बच्चू कडू

खाजगी शिकवण्या सुरु असतील तर फौजदारी कारवाई करण्यात येईल – बच्चू कडू#BacchuKadu #LockdownSchools

Posted by Maharashtra Desha महाराष्ट्र देशा on Monday, September 14, 2020

महत्वाच्या बातम्या :