तर मी भाजपची साथ सोडेन- रामदास आठवले

मुंबई: रिपाईंचं अध्यक्षपद प्रकाश आंबेडकरांना द्यायलाही मी तयार आहे, देशातील दलित एक्यासाठी प्रकाश आंबेडकरांनी पुढाकार घेतल्यास मी भाजपाची साथ आणि मंत्रीपद सोडायला मागेपुढे पाहणार नाही, असे रामदास आठवले यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये स्पष्ट केले.

रामदास आठवले म्हणाले, माझी पुन्हा लोकसभेत जाण्याची इच्छा आहे. युती झाली तर शिवसेनेनं मला दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदार संघ सोडावा, अशी अपेक्षाही आठवले यांनी व्यक्त केली. तसेच त्यांनी कॉंग्रेसवर सुद्धा ताशेरे ओढले दलितांवर होणाऱ्या अत्याचारांविरुद्ध मी राजीनामा द्यावा, अशी मागणी काँग्रेस करते पण आघाडीच्या राजवटीत दलितांवर अत्याचार होत असताना त्यांच्या किती मंत्र्यानी राजीनामे दिले ? असेही ते म्हणाले.