कुंबळे ला विरोध करणाऱ्या खेळाडूंना हाकला:गावसकर

मागील काही दिवसांपासून कुंबळे विरुद्ध कोहली असा संघर्ष पाहायला मिळत होता . नुकताच  अनिल कुंबळे यांनी मंगळवारी प्रशिक्षकपदाचा राजीनामा दिल्याच  माजी कर्णधार सुनील गावसकर यांना आवडलेलं नाही .
कुंबळे शिस्तबद्ध आहे. हीच बाब खेळाडूंना खटकत होती. शिस्तीचे पालन न करणारे खेळाडूच त्याच्यावर नाराज होते तसेच कुंबळे सारख्या गुणी प्रशिक्षकाला विरोध करणाऱ्या खेळाडूंना हाकला अशी जाहीर मागणीच गावसकर यांनी केली आहे
नक्की काय म्हणाले आहेत गावसकर
 ‘आज सराव नाही केला तरी चालेल, तुम्हाला बरं वाटत नाही, सुट्टी घ्या आणि शॉपिंग करा, असं म्हणणारा प्रशिक्षक तुम्हाला हवा आहे का? असा सवाल गावसकर यांनी खेळाडूंना केला. कुंबळे शिस्तबद्ध आहे. त्याच्या प्रशिक्षकपदाच्या कार्यकाळात भारतीय संघाची कामगिरी उंचावली असून त्यामुळं कुंबळेविषयी तक्रार करणाऱ्या खेळाडूंनी खुशाल संघाबाहेर पडावं, असा रागही त्यांनी व्यक्त केला. खेळाडूंसमोर नतमस्तक तरी व्हावं लागेल किंवा अनिल कुंबळेसारखं पद तरी सोडावं लागेल, असा संदेश संभाव्य प्रशिक्षकाला यातून मिळाला आहे. ही खूपच दुःखद बाब आहे.
दोन-तीनपेक्षा अधिक लोकांच्या गटात मतभेद नेहमीच पाहायला मिळतात. तणावपूर्ण परिस्थितीत असं होतं. कुंबळेनं प्रशिक्षकपदाचा पदभार सांभाळल्यानंतर टीम इंडियानं चांगलं यश मिळवलं. एका वर्षात कुंबळेनं काही चुकीचं केलंय, असा मला तरी वाटत नाही. त्यानंतरही कुंबळेला राजीनामा द्यावा लागला. याचाच अर्थ त्या गटात आणि कुंबळेमध्ये नक्कीच काही तरी घडलं असावं.
‘ कुंबळेचा राजीनामा’
मुख्य प्रशिक्षकपदाचा कार्यकाळ वाढवण्याबाबत मला जेव्हा विचारण्यात आलं तेव्हा अभिमान वाटला.
गेल्या एक वर्षात संघाने जी कामगिरी केली आहे,
त्याचं श्रेय कर्णधार, संघ, प्रशिक्षक आणि सर्व सपोर्टिंग स्टाफला जातं.
मात्र माझी काम करण्याची शैली आणि कार्यकाळ वाढवण्याबाबत कर्णधाराला आक्षेप असल्याचं बीसीसीआयकडून कळवण्यात आलं.
कर्णधार आणि प्रशिक्षक यांच्यातील मर्यादांचा मी नेहमी आदर केला असताना हे ऐकून मलाही आश्चर्य वाटलं.
कर्णधार आणि माझ्यातील गैरसमज दूर करण्याचा बीसीसीआयने प्रयत्नही केला.
मात्र त्यातून काहीही तोडगा निघाला नाही.
त्यामुळे पदावरुन पायउतार होण्याचा निर्णय मी घेतला.
व्यवसायिकपणा, शिस्त, वचन, प्रामाणिकपणा, पूरक कौशल्य आणि अपेक्षित दृष्टीकोन हे माझ्या कामाचं सूत्र होतं.
चांगल्या कामगिरीसाठी या गोष्टी आवश्यकच आहेत.
प्रशिक्षकाची जबाबदारी ही समोर आरसा धरून उभा राहणाऱ्यासारखी असते.
संघाला पाहिजे, तसा बदल प्रशिक्षकाने करायचा असतो, हे मी देखील पाहिलेलं आहे.
हे सर्व पाहता या जबाबदारीतून मुक्त होण्याचा मार्ग मी निवडला.
गेल्या एक वर्षापासून मुख्य प्रशिक्षक म्हणून काम करताना आनंद वाटला.
त्यासाठी क्रिकेट सल्लागार समिती, बीसीसीआय आणि क्रिकेट प्रशासनाचे आभार मानतो.
भारतीय क्रिकेटच्या असंख्य चाहत्यांनाही मी धन्यवाद देऊ इच्छितो.
भारतीय क्रिकेटचा मी नेहमी हितचिंतक राहिन.