‘जावेद अख्तरसारखी माणसे भारतात राहून असे बोलत असतील तर…’ ; राम शिंदेंचा प्रहार

ram shinde vs javed

अहमदनगर : प्रसिद्ध गीतकार जावेद अख्तर यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या बाबत केलेल्या एका वक्तव्यामुळे नवा वाद निर्माण झाला आहे. तालिबान विषयी आपले मत व्यक्त करताना जावेद अख्तर यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि बजरंग दल या संघटनांवर देखील टीका केली आहे.

तालिबान हे जंगली असून त्यांचे कृत्य निंदनीय आहे. भारतात आरएसएस, विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाचे जे समर्थन करतात ते सुद्धा तालिबान सारखेच आहेत असं म्हटलं होते.जावेद अख्तर यांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे. अनेक मोठ्या नेत्यांनी यावर संतप्त प्रतिक्रिया दिल्या आहेत. यावर आता भाजपचे माजी मंत्री प्रा. राम शिंदे यांनी देखील भाष्य केले आहे.

जावेद अख्तर यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची तालिबानशी तुलना केल्याच्या विषयावर बोलताना प्रा. शिंदे म्हणाले, ‘जावेद अख्तरसारखी माणसे भारतात राहून इतर देशांबद्दल बोलत असतील तर त्यांचा जाहीर निषेध केला पाहिजे. हा भारत देश आहे. दीडशे वर्षे राज्य केलेल्या इंग्रजांना घालवून येथे लोकशाही आणलेली आहे. त्यामुळे येथे कोणी इतर देशांचे दाखले देऊ नयेत. अशा बेताल वक्तव्य करणाऱ्यांसंबंधी न बोललेलेच बरे,’ असे राम शिंदे यावेळी म्हणाले आहेत.

महत्त्वाच्या बातम्या