‘पंकजा मुंडे शिवसेनेत येत असतील तर मी त्यांचे आनंदाने स्वागत करेल’

टीम महाराष्ट्र देशा : भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्या फेसबुक पोस्टमुळे राजकीय वर्तुळात चांगलीचं चर्चा माजली आहे. पंकजा मुंडे यांनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये पुढे काय करायचं ? कोणत्या मार्गाने जायचं? आपल्या लोकांना आपण काय देऊ शकतो? या सर्व बाबींचा सर्वांगाने विचार करून येत्या १२ डिसेंबरला आपल्यासमोर येणार आहे, असे लिहिले होते. त्यामुळे राजकीय वर्तुळात पंकजा मुंडे भाजपला रामराम ठोकून शिवसेनेत जाणार असल्याची चर्चा रंगली आहे.

त्यावर आता शिवसेना नेते आ. अब्दुल सत्तार यांनी भाष्य केले आहे. पंकजा मुंडे यांनी त्यांची भूमिका काय आहे ती स्पष्ट करावी. पुढे कोणत्या पक्षात जायचं हा त्यांचा निर्णय आहे. पण जर त्या शिवसेनेत येत असतील तर मी त्यांचे आनंदाने स्वागत करेल असे, अब्दुल सत्तार म्हणाले आहेत.

दरम्यान शिवसेना नेते खा. संजय राऊत यांनीही पंकजा मुंडे यांच्याबाबत सूचक विधान केले होते. पंकजा मुंडेच काय तर राज्यातील अनेक नेते शिवसेनेच्या वाटेवर असल्याची प्रतिक्रिया खा. संजय राऊत यांनी दिली आहे. पंकजा मुंडेंचा 12 तारखेलाच कळेलही असेही ते म्हणाले आहे. यामुळे राजकीय वर्तुळात आता चर्चांना उधाण आले आहे.राऊत यांनी दिलेल्या प्रतिक्रियेमुळे एकच खळबळ उडाली आहे.

महत्वाच्या बातम्या

Loading...