पाकिस्तानने जर भारतावर हल्ला केला तर भारताकडून चोख प्रत्युत्तर दिले जाईल : रविशंकर प्रसाद

टीम महाराष्ट्र देशा : गेले काही दिवस भारत आणि पाकिस्तानमध्ये तणाव सदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. जम्मू काश्मीरला दिलेले कलम 370 मोदी सरकारने हटवल्यानंतर पाकिस्तानला चांगलाचं दणका बसला आहे. त्यामुळे पाकिस्तानचे सैरभैर पंतप्रधान इम्रान खान हे भारताशी युद्ध करणार असल्याची धमकी वारंवार देत आहेत. यावरून भारताचे केंद्रीय विधी व न्याय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.

पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान व अन्य नेत्यांच्या इशाऱ्यांना प्रतिसाद देणार नाही, पण पाकिस्तानने भारतावर हल्ला केल्यास चोख प्रत्युत्तर देऊ. भारत स्वत:ची सुरक्षा करण्यास पूर्णपणे सक्षम आहे. त्यामुळे पाकिस्तानने जर हल्ला केला तर त्याला चोख प्रत्युत्तर भारताकडून मिळेल.तसेच आर्टिकल 370 रद्द करण्याचा निर्णय काश्मिरी जनतेच्या भल्यासाठी घेण्यात आला आहे. यात देशाचेही हित आहे, असे ही रविशंकर प्रसाद म्हणाले.

राज्य विधी सेवा प्राधिकरणांच्या दोन दिवसीय अखिल भारतीय संमेलनाला शनिवारपासून सुरुवात झाली. हे १७ वे संमेलन असून त्यात देशभरातील १०० वर न्यायाधीश सहभागी होत आहेत. या संमेलनाचे यजमानपद नागपूरला पहिल्यांदाच मिळाले आहे.वर्धा रोडवरील हॉटेल रेडिसन ब्ल्यू येथे आयोजित या संमेलनाचे शनिवारी सकाळी केंद्रीय विधी व न्यायमंत्री रविशंकर प्रसाद यांच्या हस्ते झाले.यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती शरद बोबडे, न्यायमूर्ती एन. व्ही. रामना, मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती प्रदीप नांदराजोग, आदि मान्यवर उपस्थित होते.