‘अल्पसंख्याकांवर अत्याचार झाला तर अत्याचार करणाऱ्याला सुखाने झोपू देणार नाही’

टीम महाराष्ट्र देशा : “शिक्षण,औषधोपचार,न्याय या सर्वांसाठी जनतेला पैसे मोजावे लागत आहेत. त्यामुळे या देशात शिक्षण, उपचार, न्याय मोफत देणारे सरकार आणायचे आहे. आजच्या घडीला देशाला पैसेवाले, दलाल नव्हे तर जनतेची सेवा करणारे लोकप्रतिनिधी हवे आहेत.मात्र देशात अल्पसंख्याकावर हल्ले होत आहेत, जर का अल्पसंख्याकांवर अत्याचार झाला तर अत्याचार करणाऱ्याला सुखाने झोपू देणार नाही,असा इशारा भीम आर्मीचे प्रमुख चंद्रशेखर आझाद यांंनी दिला आहे.

महाराष्ट्र दौऱ्यावर असलेल्या चंद्रशेखर आझाद यांनी आज अमरावती येथे जाहीर सभा घेतली. या सभेला संबोधित करताना चंद्रशेखर आझाद म्हणाले की,हा देश तुमच्या बापाच्या इशाऱ्यावर नाही, तर देशाच्या संविधानानुसार चालेल. संविधानाचे रक्षण हाच भीम आर्मीचा उद्देश, संविधानाला धक्का बसल्यास गप्प बसणार नाही. त्याला भीम आर्मी आपल्या शैलीने उत्तर दिले जाईल असेही यावेळी आझाद म्हणाले.