मुंडे भाऊ – बहिण एकत्र आले तर महालक्ष्मीची पूजा करेन -चंद्रकांत पाटील

chandrakant dada , pankaja munde and dhananjay munde

मुंबई – मागील आठवड्यात ऑडीओ सीडीच्या प्रकरणावरून विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे आणि ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांच्या चांगलाच वाद रंगलेला पहायला मिळाला होता. या पार्श्वभूमीवर मुंडे भाऊ – बहिण एकत्र आले तर महालक्ष्मीची पूजा करेन असं वक्तव्य महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केलं आहे.

राज्यपाल अभिभाषणा दरम्यान धनंजय मुंडे यांनी कर्जंमाफी झालेल्या शेतक-यांची यादी पटलावर ठेवण्याची मागणी केली होती या चर्चेला उत्तर देतांना चंद्रकांत पाटील यांनी जिल्ह्या जिल्ह्यात कर्जमाफी झालेल्या शेतक-यांचे मेळावे घेऊन त्या मेळाव्यांना मी आणि धनंजय मुंडे सोबत जाऊ, हवे तर बीड मध्येही मेळावा घेऊ असं आश्वासन दिले .

राष्ट्रवादीच्या बाकांवरुन पालकमंत्री यांना बरोबर घेणार का, असा गंमतीने मुद्दा उपस्थित केला. हा रोख अर्थात धनंजय मुंडे आणि बीडच्या पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्या दिशेने होता. तेव्हा हे दोघे एकत्र आले तर महालक्ष्मीची मोठी पूजा करेन, अशी कोपरखळी मारत चंद्रकांत पाटील यांनी उत्तर दिलं.ज्यानंतर संपूर्ण सभागृहात हशा पिकला